वडाळ्यात भरधाव ट्रकच्या धडकेत बाईकवरील दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 23:43 IST2017-08-09T23:43:21+5:302017-08-09T23:43:29+5:30
वडाळ्यातील भक्ती पार्क येथील मोनो रेल बस स्टॉपजवळ बाईक पार्क करून रस्त्याच्या दुभाजकावर बसलेल्या तीन जणांना भरधाव ट्रकनं उडवलं आहे.

वडाळ्यात भरधाव ट्रकच्या धडकेत बाईकवरील दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
मुंबई, दि. 9 - वडाळ्यातील भक्ती पार्क येथील मोनो रेल बस स्टॉपजवळ बाईक पार्क करून रस्त्याच्या दुभाजकावर बसलेल्या तीन जणांना भरधाव ट्रकनं उडवलं आहे. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीररीत्या जखमी आहे. 23 वर्षीय विनायक भास्कर ढगे, 25 वर्षीय सिद्धेश मासे यांचा मृत्यू झाला आहे. तर 22 वर्षीय सिद्धेश सुरेश चव्हाण गंभीररीत्या जखमी आहे. ट्रक चालकाविरोधात वडाळा टीटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, 45 वर्षीय ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करतायत.