Join us

आमदार रोहित पवार अन् निलेश राणे यांच्यातील ‘ट्विटर युद्ध’ पेटलं; मला, बोलत राहिलास तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 13:48 IST

या वादाच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी ट्विटरवरुन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना थेट धमकी देत त्यांना आव्हान केलं.

ठळक मुद्देरोहित पवारांच्या ट्विटला निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाहीएकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो

मुंबई – राष्ट्रवादी आमदार रोहित पवार आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यातील ट्विटरवॉर संपण्याची चिन्हे दिसत नाही. साखर उद्योगावरील शरद पवारांवरील ट्विटला आमदार रोहित पवार यांनी निलेश राणेंना उत्तर दिल्यानंतर निलेश राणे यांनी रोहित पवारांवर तीव्र शब्दात टीका केली होती. त्यानंतर रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यात वादात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उडी घेतली होती.

या वादाच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी ट्विटरवरुन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना थेट धमकी देत त्यांना आव्हान केलं. त्यावरुन रोहित पवारांनी ट्विट करत आपले विचार,आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो असा टोला निलेश राणेंना लगावला.

त्यानंतर रोहित पवारांच्या या ट्विटला निलेश राणेंनी प्रत्युत्तर देत म्हणाले की, बोलणाऱ्याची लायकी बघून मी उत्तर देतो धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुझं काम माहीत आहे मला, बोलत राहिलास तर त्याचं पण ट्रेलर देईन मग लोकंच चप्पलेच्या प्रदर्शनात बसवतील तूला अशी अप्रत्यक्षरित्या धमकी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साखर उद्योग वाचविण्याची मागणी केली होती. त्यावर शनिवारी भाजप नेते निलेश राणे यांनी कोणत्या साखर कारखानदाराकडे किती संपत्ती आहे, याचे ऑडिट झाले पाहिजे, अशी मागणी ट्विटद्वारे केली होती. राणेंच्या या ट्विटवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया नोंदविताना म्हटले की, ‘पवार साहेबांनी साखर उद्योगासह कुक्कुटपालन व इतर उद्योगांच्या दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठविले आहे. यावर निलेश राणेंनी ‘मी साखरेवर बोललो. पवार साहेबांवर नाही. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली? मतदारसंघावर लक्ष दे. सगळीकडे नाक नको टाकू. नाहीतर साखर कारखान्यासारखी हालत होईल तुझी असं उत्तर रोहित पवारांना दिलं होतं.

तर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या ट्विटमध्ये निलेश राणेंना उत्तर देत सांगितलं होतं की, आमदार रोहित पवार यांनी अत्यंत सभ्य भाषेत आपले मत मांडले. पवार कुटुंबीयांच्या अंगी असलेल्या सभ्यपणा, सुसंस्कृतपणा, अभ्यासूपणा या गुणांमुळेच आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते पवार कुटुंबीयांवर मनापासून प्रेम करतात. आणि हो राष्ट्रवादीवाले टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात, असं तनपुरे यांनी म्हटलं होतं.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

निलेश राणेंवर तृतीयपंथी भडकले; 'हिजडा' शब्दावरून दिला इशारा

टोयोटा कल्ला करणार; हॅरिअरसारखी खतरनाक SUV Venza आणणार

कोरोना संकटात पीएफ काढताय? रिजेक्ट न होण्यासाठी या पाच चुका टाळा

CoronaVirus चीनने आधी 'मारले', आता औषध देण्याची तयारी; जगाच्या भल्यासाठी घेतले दोन मोठे निर्णय

टॅग्स :रोहित पवारनिलेश राणे शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस