Join us

रुजू होण्यापूर्वीच तुकाराम मुंढेंची बदली झाली रद्द; आता नव्या नियुक्तीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 06:28 IST

मनुकुमार श्रीवास्तव ‘गृह’मध्ये

मुंबई : नागपूर महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून झाली खरी; पण त्याठिकाणी रुजू होण्याआधीच तीदेखील रद्द करण्यात आली आहे. त्यांना आता नव्या नियुक्तीची प्रतीक्षा असेल, तर ज्येष्ठ सनदी अधिकारी मनुकुमार श्रीवास्तव यांची गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (अपिले आणि सुरक्षा) या पदावर बदली करण्यात आली.

तुकाराम मुंढे हे जीवन प्राधिकरणात रुजू होण्यापूर्वीच त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याचे आदेश मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांना देण्यात आले आहेत. मुंढे यांची २७ ऑगस्टला नागपूर महापालिका आयुक्त पदावरून जीवन प्राधिकरणात बदली करण्यात आली होती.

सीताराम कुंटे कायम

श्रीकांत सिंह यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त असलेल्या पदावर श्रीवास्तव यांची बदली करण्यात आली. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे कायम असतील.

टॅग्स :तुकाराम मुंढेनागपूरमहाराष्ट्र सरकार