राज्य सरकारकडून १४ IAS अधिकाऱ्यांची बदली; अश्विनी भिडे मेट्रोमध्येच, बांगर मुंबई महापालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 06:12 AM2024-03-20T06:12:25+5:302024-03-20T06:13:03+5:30

अश्विनी भिडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी

Transfer of 14 IAS Officers by State Govt.; Ashwini Bhide in Metro, Bangar in Mumbai Municipal Corporation | राज्य सरकारकडून १४ IAS अधिकाऱ्यांची बदली; अश्विनी भिडे मेट्रोमध्येच, बांगर मुंबई महापालिकेत

राज्य सरकारकडून १४ IAS अधिकाऱ्यांची बदली; अश्विनी भिडे मेट्रोमध्येच, बांगर मुंबई महापालिकेत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी १४ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली.  मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भिडे यांना या पदाचा दीर्घ अनुभव आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बदली मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेचे आणखी एक अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू यांच्या जागी बांगर यांची बदली करण्यात आली. वेलारसू नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.  बांगर यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. अश्विनी भिडे यांच्या जागी मुंबई महापालिकेत अमित सैनी यांची अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांची बदली सहकार आयुक्त; पुणे या पदावर करण्यात आली.

शुभम गुप्ता हे जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. विशाल नरवाडे हे धुळे जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. नागपूर महानगर प्राधिकरणाचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी संजय मीणा यांना नेमण्यात आले आहे. - सविस्तर/८

Web Title: Transfer of 14 IAS Officers by State Govt.; Ashwini Bhide in Metro, Bangar in Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.