Torrential rains in Mumbai and Konkan; There will be heavy rains in sparse places | मुंबईसह कोकणात मुसळधार; तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार

मुंबईसह कोकणात मुसळधार; तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार

ठळक मुद्दे१४ जुलै : कोकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच कडकडाट होईल.१५ जुलै : कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल.१६ जुलै : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.१७ जुलै : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.


मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कम बॅक केले आहे. रविवारसह सोमवारी पाऊसमुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी विश्रांती घेत मुसळधार बरसला आहे. पावसाचे हे बरसणे सुरु असतानाच आता मंगळवारसह बुधवारी मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. १४, १५ आणि १६ जुलै रोजी महाराष्ट्राच्या किना-यावर सोसाटयाचा वारा वाहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने आता चांगला जोर पकडला आहे. विशेषत: मुंबईच्या उपनगरात पावसाचा जोर अधिक आहे. गेल्या दोन दिवसांपासून दाटून येणारे ढग मुंबईला झोडपून काढत असून, विशेषत: रात्रीच्या वेळेला दाखल होणारा पाऊस मुंबईला झोडपून काढत आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता, दुपारी ४ वाजता मुंबईत तुरळक ठिकाणी मोठया सरी कोसळल्याचे चित्र होते. काही ठिकाणी मात्र ऊनं देखील पडले होते. सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत २० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला. मध्य मुंबईत ४० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात २० ते ४० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. नरिमन पॉइंट, भायखळा, वरळी, माहीम, कुर्ला, बीकेसी, बोरीवली, कांदिवली, पवईसह लगतच्या परिसराचा यात समावेश आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Torrential rains in Mumbai and Konkan; There will be heavy rains in sparse places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.