Join us  

'विरोधीपक्षातील प्रमुख नेत्यांनी जास्त निधी घेतला'; जितेंद्र आव्हाडांचा आरोप, वड्डेटीवार यांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 8:51 AM

महाविकास आघाडी नेत्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) : मुंबई- राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन झाले, आता निधी वाटपावरुन जोरदार-आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवरच टीकास्त्र सोडले आहे."विरोधी पक्षातील काही नेत्यांना श्रीखंड तर काहींना पिठलं भाकरी मिळाली. ठरावीक मोठ्या नेत्यांनाच निधी मिळाला आणि ९० टक्के आमदारांना निधीच मिळाला नाही, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. आव्हाड यांच्या या आरोपाला विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

"विरोधकांच्या ९० टक्के आमदारांना एक रुपयाही मिळालेला नाही, पण प्रमुख जर पैसे मिळाले असतील तर त्यांनी नाकारायला हवे होते. प्रमुख नेत्यांनी जे पैसे घेतले ते आम्हाला बाहेरुन कळतंय. एकत्र रहायचे, एका ताटात जेवायचे मग सर्वांनी सारखच खायचे, असा टोलाही आमदार आव्हाड यांनी लगावला. 

यावर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वड्डेटीवार म्हणाले, जितेंद्र आव्हाड भांबावला आहे. पागलसारखा झाला आहे. तो काय बोलतो ते त्यालाच कळत नाही. आमच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पक्षातील जयंत पाटील, राजेश टोपे यांना मिळालेल्या निधीवर बोलावे, असं प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी दिले. 

नागपूर अधिवेशन ‘कोमट’ होण्यास कारण की... भाजपच्या बैठकीला गडकरी, पंकजांचे जाणे सहज घडलेले नाही

"आम्ही कोणाच्या दालनात जाऊन पैसे मागितलेले नाहीत. मला नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांना पैसे मिळाले. थोडो थोडे २६, २७ कोटी रुपये मिळाले आहेत तसेही त्यांच्या पक्षाचे जयंत पाटील, राजेश टोपे यांना पैसे मिळाले आहेत. त्यांच्यावर आरोप करा आमच्यावर का आरोप करता, असंही विजय वड्डेटीवार म्हणाले.  यामुळे आता महाविकास आघाडी नेत्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे. 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडविजय वडेट्टीवारराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसविधानसभा हिवाळी अधिवेशन