आयटीआय प्रवेश निश्चित करण्यास आज अखेरची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 03:44 AM2021-02-07T03:44:51+5:302021-02-07T07:46:22+5:30

ऑनलाइन पद्धतीने भरणार जागा; उद्या जाहीर हाेणार गुणवत्ता यादी

Today is the last chance to secure ITI admission | आयटीआय प्रवेश निश्चित करण्यास आज अखेरची संधी

आयटीआय प्रवेश निश्चित करण्यास आज अखेरची संधी

googlenewsNext

मुंबई : राज्यातील सर्व आयटीआयमध्ये यंदा १ लाख ३ हजार २९१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. प्रवेशाला कोरोनाचा फटका बसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेशावर थोडा परिणाम झाला असला तरी आता पुन्हा नव्याने संधी देण्यात आली आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रवेश अर्ज सादर करणे व प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे आजपर्यंत प्रवेश अर्ज करता येतील, तर गुणवत्ता यादी उद्या ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होईल.

सर्व जागा या केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने भरल्या जाणार असून, त्यासाठी केंद्रीय पद्धतीने उपलब्ध जागा व संस्थास्तरावरील जागांसाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन प्रवेश प्रणालीव्यतिरिक्‍त प्रवेश घेता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने म्हटले आहे. ज्या संस्थांमध्ये शिल्‍लक जागा राहिल्या आहेत, अशा जागांवर प्रवेश दिला जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाची शेवटची संधी असेल.

असे झाले प्रवेश
शैक्षणिक वर्ष - २०२०-२१
फेऱ्या               शासकीय    खासगी    एकूण
जागा               ९२,८२३    ५४,९७६    १,४७,८१२
पहिली फेरी    २०,४६२    ५,५८७    २६,०४९
दुसरी फेरी    ९,९५०    ३,३२६    १३,२७६
तिसरी फेरी    १०,०२९    २,९१८    १२,९४७
चौथी फेरी    ९,६५०    १,८४५    ११,४९५
संस्थास्तर फेरी    ०    ८,६७५    ८,६७५
समुपदेशन फेरी    २६,००६    ४,०९९    ३०,१०५
एकूण प्रवेश    ७६,०९५    २,७१,९४    १,०३,२९१
टक्केवारी    ८१.९७    ४९.४७    ६८.८८
खासगी आयटीआयमधील संस्थास्तरावरील प्रवेश : १५ फेब्रुवारी रोजी.

नवे वेळापत्रक
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती, प्रवेश अर्जाचे शुल्क भरणे : ७ 
फेब्रुवारीपर्यंत.
 गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : फेब्रुवारी ५ वा.
 प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाचा कालावधी : ९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी.

Web Title: Today is the last chance to secure ITI admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.