तीन तास उलटले, भावासोबत खेळता खेळता चिमुकला पडला नाल्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 17:21 IST2020-06-11T17:19:43+5:302020-06-11T17:21:46+5:30
सध्या स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत आहेत.

तीन तास उलटले, भावासोबत खेळता खेळता चिमुकला पडला नाल्यात
मुंबई - घाटकोपर पूर्व येथील सावित्री फुले नगर परिसरातील नाल्यात ५ वर्षाचा चिमुरडा पडला आहे. आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलीस, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी मुलाचा शोध घेत आहेत. हुसेन हमीद शेख असे या मुलाचे नाव आहे.
ही घटना घडून तीन तास उलटून गेले आहेत. मुलाचा शोध घेण्याचे कार्य सध्या सुरू आहे. हुसेन हमीद शेख याच नाल्याच्या बाजूला रहातो. दुपारी १२ वाजताच्या सुमारास तो भावासोबत खेळत असताना नाल्यात पडला. त्याचा आईने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो नाल्याची सफाई झालेली असल्याने त्यात बुडाला. सध्या स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत आहेत.
घाटकोपर येथील नाल्यात ५ वर्षाचा मुलगा पडला, पोलीस अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी मुलाचा शोध घेत आहेत
— Lokmat (@MiLOKMAT) June 11, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला
Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही
खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या