ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:06 IST2025-06-19T13:50:18+5:302025-06-19T14:06:09+5:30

उद्धव ठाकरे यांच्या दोन माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Three former corporators of Uddhav Thackeray join Eknath Shinde Shiv Sena | ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत

ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत

Eknath Shinde Shiv Sena: शिवसेनेच्या वर्धापनदिनीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे ठाकरेंच्या दोन माजी नगरसेवकांचा शिंदे यांच्या शिवसेनेत आज प्रवेश होणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांनी कालच मातोश्रीवर माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती त्या बैठकीतच उपस्थित असलेले दोन माजी नगरसेवक आज शिंदे गटात जाणार आहेत.

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे आणि माजी नगरसेवक आणि विभागप्रमुख अजित भंडारी शाखाप्रमुख संजय जंगम आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत तर शरद पवार गटाचे माजी नगरसेवक देखील आज शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे हे नगरसेवक उद्धव ठाकरेंनी मातोश्री येथे बोलवलेल्या बैठकीला उपस्थित होते. मात्र पक्षप्रमुखांनी समस्या जाणून न घेतल्याने माजी नगरसेवकांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

"गेल्या साडेतीन वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा अजेंडा घेऊन मी चांदीवली विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा संघटक म्हणून माझं काम करत आहे. मधल्या काळात काही संघटनात्मक बदल झाले. आम्ही वाईट काळामध्ये संघटनेसोबत ठामपणे काम करत होतो. वरिष्ठांच्या नेमणुका झाल्यानंतर त्यांनी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला. ते खूप मनाला लागले. जेव्हा गरज होती तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरत होतो. आमचा रोष स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पदावर आल्या आल्या काही शाखाप्रमुखांना काढलं. मलाही बाजूला केलं हे आमच्या मनाला लागलं, असं माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

"काल मी बैठकीसाठी मातोश्रीवर होतो आणि माझी अपेक्षा होती की पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व मला बाजूला घेऊन माझ्याशी चर्चा करतील. कारण याची कल्पना मी पक्षाच्या वरिष्ठांना दिली होती. परंतु तसे काही झाले नाही. त्यामुळे आपली काही इथे गरज असेल असं वाटत नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला," असेही विजेंद्र शिंदे म्हणाले.

Web Title: Three former corporators of Uddhav Thackeray join Eknath Shinde Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.