आमदार अस्लम शेख यांना मारण्याची धमकी, कुख्यात गुंड गोल्डी ब्रारच्या नावाने फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 10:30 IST2023-10-09T10:28:29+5:302023-10-09T10:30:23+5:30

गोरेगाव येथील बांगुरनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला आहे. 

Threat to kill MLA Aslam Shaikh, phoned in the name of notorious gangster Goldie Brar | आमदार अस्लम शेख यांना मारण्याची धमकी, कुख्यात गुंड गोल्डी ब्रारच्या नावाने फोन

आमदार अस्लम शेख यांना मारण्याची धमकी, कुख्यात गुंड गोल्डी ब्रारच्या नावाने फोन

मुंबई : कुख्यात गुंड गोल्डी ब्रार याच्या नावाने दूरध्वनी करत काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. गोरेगाव येथील बांगुरनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला आहे. 

आमदार शेख यांच्या वतीने त्यांचे स्वीय सहायक आणि वकील विक्रम कपूर यांनी फिर्याद दिली आहे. कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांना शेख यांच्या मोबाइलवर अज्ञात नंबरवरून कॉल आला. दूरध्वनी करणाऱ्याने स्वतःची ओळख गोल्डी ब्रार म्हणून केली. ‘मैं गोल्डी ब्रार बोल रहा हूँ, मैं अस्लम शेख को दो दिन में गोली मारकर उडाने वाला हूं, ये अस्लम शेख को बता दो’, असे त्याने धमकावले. धमकीचा कॉल करण्यासाठी संबंधिताने दोन वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांचा वापर केला. 

कपूर यांनी शेखना याबाबत माहिती दिली. त्यानंतर कपूर यांनी परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त अजयकुमार बंसल यांना दिलेल्या लेखी तक्रारअर्जावरून बांगूरनगर पोलिसांनी एफआयआर नोंदवला. अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Threat to kill MLA Aslam Shaikh, phoned in the name of notorious gangster Goldie Brar