"एक-दोन दिवसांत दहशतवादी हल्ला केला जाईल...", मंत्रालयाला धमकीचा फोन करणाऱ्याला अटक

By गौरी टेंबकर | Updated: August 8, 2023 11:03 IST2023-08-08T11:02:21+5:302023-08-08T11:03:06+5:30

मंत्रालयात धमकीचा फोन करून एक-दोन दिवसांत दहशतवादी हल्ला केला जाईल, असे त्याने रात्री १० वाजता सांगितल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

threat caller to Mantralaya arrested in mumbai | "एक-दोन दिवसांत दहशतवादी हल्ला केला जाईल...", मंत्रालयाला धमकीचा फोन करणाऱ्याला अटक

"एक-दोन दिवसांत दहशतवादी हल्ला केला जाईल...", मंत्रालयाला धमकीचा फोन करणाऱ्याला अटक

 मुंबई - एक-दोन दिवसांत "दहशतवादी हल्ला" होईल, असे सांगून महाराष्ट्र मंत्रालयाला धमकीचा फोन करणाऱ्या ६१ वर्षीय व्यक्तीला मुंबईपोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. प्रकाश किशनचंद खेमाणी, असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

मंत्रालयात धमकीचा फोन करून एक-दोन दिवसांत दहशतवादी हल्ला केला जाईल, असे त्याने रात्री १० वाजता सांगितल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  एका अज्ञात फोनवरून धमकी आली, त्यानंतर पोलिसांनी फोन करणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Web Title: threat caller to Mantralaya arrested in mumbai