मॉडेलच्या घरातून चाेरट्यांनी साेनसाखळी लांबवली; दोन मैत्रिणी अन् मोलकरणीवर संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:59 IST2025-10-09T10:59:42+5:302025-10-09T10:59:49+5:30
२६ सप्टेंबरला सोनसाखळी जागेवर नसल्याचे सिंग यांच्या लक्षात आले. याबाबत सिंग यांनी शर्मा, डाबला आणि हलदार यांच्याकडे विचारणा केली. मात्र, तिघींनीही काहीच माहिती नसल्याचे सांगितले.

मॉडेलच्या घरातून चाेरट्यांनी साेनसाखळी लांबवली; दोन मैत्रिणी अन् मोलकरणीवर संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहणाऱ्या मॉडेल निकिता सिंग (वय २८) यांच्या घरातून सव्वा लाख रुपयांची सोन्याची साखळी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिंग यांनी तक्रारीत दोन मैत्रिणी आणि घरकाम करणाऱ्या मोलकरणीवर संशय व्यक्त केला असून ओशिवरा पोलिसांनी तिघींवर गुन्हा नोंदवला आहे.
सिंग या सुमन टॉवरमध्ये एकट्या राहतात. सुपरना हलदार (३०) ही त्यांच्याकडे घरकामासाठी दुपारी येते. तर, सिंग यांच्या मैत्रिणी दिव्या शर्मा आणि अनु डाबला या दिल्लीतील रहिवासी आहेत. डाबला ही त्यांच्या घरी काही दिवसांसाठी राहायला आली होती.
...यामुळे बळावला संशय
२६ सप्टेंबरला सोनसाखळी जागेवर नसल्याचे सिंग यांच्या लक्षात आले. याबाबत सिंग यांनी शर्मा, डाबला आणि हलदार यांच्याकडे विचारणा केली. मात्र, तिघींनीही काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे संशय व्यक्त करत सिंगने तक्रार दिली आहे.