‘ते’ आमदार म्हणतात, आम्ही गोंधळलो होतो; जयंत पाटील यांचा दावा, ५ रोजी बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 07:03 IST2023-07-03T07:02:58+5:302023-07-03T07:03:07+5:30
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर या कृतीला शरद पवारांचा किंवा राष्ट्रवादीचा कोणताही पाठिंबा नाही, हे राज्यातील जनतेला समजले आहे.

‘ते’ आमदार म्हणतात, आम्ही गोंधळलो होतो; जयंत पाटील यांचा दावा, ५ रोजी बैठक
मुंबई : बंड करून अजित पवार यांच्याबरोबर गेलेले काही आमदार पुन्हा आम्हाला संपर्क करत आहेत. आम्ही गोंधळलेलो होतो, अशी भूमिका काही आमदारांनी शरद पवारांकडे आणि माझ्याकडे बोलून दाखवल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. मुंबईत पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर या कृतीला शरद पवारांचा किंवा राष्ट्रवादीचा कोणताही पाठिंबा नाही, हे राज्यातील जनतेला समजले आहे. शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची ५ तारखेला मुंबईत बैठक बोलवली आहे. बैठकीला पक्षाचे तालुका, जिल्हा स्तरावरील पदाधिकारी, पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत शरद पवार आपली भूमिका अधिक विस्तृतपणे मांडतील, असेही पाटील म्हणाले. ज्या नऊ जणांनी शपथ घेतलेली आहे, त्यांनी पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जाऊन पलीकडे पाऊल टाकलेले आहे. उरलेल्या आमदारांना मी दोष देणार नाही.