‘चेतनसिंहच्या आजाराबाबत नोंद नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 14:36 IST2023-08-03T14:35:25+5:302023-08-03T14:36:14+5:30

तो खरंच कुठल्या आजाराने ग्रस्त होता का? याबाबत अधिक तपास सुरू असल्याचेही रेल्वेने नमूद केले आहे. 

There is no record of Chetansingh's illness | ‘चेतनसिंहच्या आजाराबाबत नोंद नाही’

‘चेतनसिंहच्या आजाराबाबत नोंद नाही’

मुंबई : जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये चार जणांना गोळ्या झाडणारा चेतन सिंहच्या मानसिक आजाराबाबत कुठलीही अधिकृत नोंद नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे तसेच, रेल्वे संरक्षण दलाच्या हवालदारांची नियतकालिक वैद्यकीय तपासणीतही (पीएमई) काही समोर आले नव्हते, असेही रेल्वे विभागाने सांगितले आहे. तो खरंच कुठल्या आजाराने ग्रस्त होता का? याबाबत अधिक तपास सुरू असल्याचेही रेल्वेने नमूद केले आहे. 
 
गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत चौकशी सुरू आहे. घटनेनंतर, आरपीएफचे महानिरीक्षक पी. सी. सिन्हा यांनीच पत्रकारांना माहिती देताना, आरोपी जवान रागीट होता. त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. तो नुकताच सुटीवरून आला होता. त्याने प्रथम त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गोळी झाडली, त्यानंतर इतर प्रवाशांना मारल्याची माहिती दिली होती. 

त्यापाठोपाठ बुधवारी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, चेतन हा गंभीर मानसिक आजाराने त्रस्त असल्याबाबतचे वृत्त काही माध्यमांकडून  देण्यात येत आहे.
 

Web Title: There is no record of Chetansingh's illness