गेल्या महिन्यात झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौरांच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धवसेनेने या निवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणा केलेली असल्याने या निवडणुकीबाबत चुरस निर्माण झाली आहे. मात्र महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वीच उद्धवसेना आणि ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा धक्का बसला असून, निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाने वेगळी वाट निवडत महायुतीला पाठिंबा दिला आहे. मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एकमेव नगरसेवक असलेल्या अजित रावराणे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीकडून निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अजित रावराणे हे एकमेव नगरसेवक विजयी झाले होते. दरम्यान, अजित रावराणे हे महायुतीमध्ये जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. अखेरीस अजित रावराणे हे महायुतीला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट महायुतीमधील शिंदेसेनेला समर्थन देणार हे निश्चित झाल्याने महानगरपालिकेमध्ये शिंदेसेना आणि महायुतीची ताकद वाढली आहे. तसेच या पाठिंब्यामुळे विविध प्रभाग समित्या आणि विषय समित्यांच्या निवडणुकीमध्ये महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यातही मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी शिंदेसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे पालिकेत शिंदेसेनेची ताकद वाढली आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि खासकरून पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे या परिस्थितीत या विषयावर शरद पवार यांच्याशी बोलणं मला योग्य वाटत नाही. पण शरद पवार यांनी मला शिवजयंतीच्या कार्यक्रमाला येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मी जाणार आहे,. त्यावेळी मी त्यांच्यासोबत सविस्तर बोलेन, असे अजित रावराणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
Web Summary : In Mumbai, a corporator from Sharad Pawar's NCP defected to the BJP-Shinde Sena alliance before mayor elections. This boosts the ruling coalition's strength in the municipal corporation, impacting committee elections.
Web Summary : मुंबई में, शरद पवार की एनसीपी के एक पार्षद ने मेयर चुनाव से पहले भाजपा-शिंदे सेना गठबंधन में शामिल हो गए। इससे नगर निगम में सत्तारूढ़ गठबंधन की ताकत बढ़ी है, जिससे समिति चुनावों पर असर पड़ेगा।