सातासमुद्रापार घुमला महाराष्ट्र गीतचा गजर! मॉरिशसमध्ये 'महाराष्ट्र भवन' विस्तारित वास्तूचा शिलान्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 18:45 IST2026-03-24T18:39:45+5:302026-03-24T18:45:02+5:30

या सोहळ्यात महाराष्ट्र गीत आणि मॉरिशसच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली, यातून दोन देशांमधील अतूट सांस्कृतिक संबंधांचे दर्शन घडले. यावेळी सातासमुद्रापार मराठी भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवणाऱ्या अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

The sound of Maharashtra songs echoed across the ocean! Foundation stone of the 'Maharashtra Bhavan' expansion laid in Mauritius | सातासमुद्रापार घुमला महाराष्ट्र गीतचा गजर! मॉरिशसमध्ये 'महाराष्ट्र भवन' विस्तारित वास्तूचा शिलान्यास

सातासमुद्रापार घुमला महाराष्ट्र गीतचा गजर! मॉरिशसमध्ये 'महाराष्ट्र भवन' विस्तारित वास्तूचा शिलान्यास

महाराष्ट्र आणि मॉरिशस या दोन्ही प्रदेशांमधील मैत्रीचे नाते पिढ्यानपिढ्यांचे असून सातासमुद्रापार राहूनही येथील मराठी जनसमुदायाने आपली सांस्कृतिक नाळ अतिशय अभिमानाने जपली आहे असे गौरवोद्गार भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मॉरिशस येथे काढले. मॉरिशसमधील मोका येथे महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा नुकताच रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. महाराष्ट्राचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र भवन वास्तूच्या विस्तारासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याबाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

यावेळी रविंद्र चव्हाण यांनी मॉरिशसच्या दोन दिवसीय दौऱ्यात उच्चस्तरीय मान्यवरांच्या भेटी घेतल्या.  या दौऱ्यात रविंद्र चव्हाण यांनी मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष धरमबीर गोखुल यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत भारत-मॉरिशस मैत्री, ब्ल्यू इकॉनॉमी, पर्यटन, AI आणि सायबर सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. 

त्याच बरोबर मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री धनंजय रामफुल, आयटी व इनोव्हेशन मंत्री डॉ. अविनाश रामतोहूल आणि कला व सांस्कृतिक मंत्री महेंद्र गोंदीया यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या. डॉ. रामतोहूल यांनी फर्ग्युसन कॉलेजमधील त्यांच्या शिक्षणाच्या आठवणी सांगत कृत्रिम बुद्धिमत्तेवर त्यांनी लिहिलेले पुस्तक भेट दिले. 

मोका येथे “महाराष्ट्र भवन” विस्तारित वास्तूचा शिलान्यास सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ८ कोटी रुपयांच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या या वास्तूमुळे जागतिक स्तरावर मराठी अस्मिता अधिक बळकट होणार आहे. या वास्तूतील सभागृहाला “स्वातंत्र्यवीर सावरकर” यांचे नाव देण्यास स्थानिक समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम, “महा गणेशोत्सव २०२५” निमित्त अनुदान वितरण आणि भारताचे मॉरिशसमधील उच्चायुक्त अनुराग श्रीवास्तव यांच्यासमवेत ‘बिहार फेस्टिव्हल’ला दिलेली भेट या माध्यमातून सातासमुद्रापार भारतीय संस्कृतीचा जागर अधिक बळकट झाला.

मॉरिशसमधील खासदार अर्विन बाबाजी, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे मुख्य धर्मगुरु गुरुजी संताराम राजू,  मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष बलराज नारू, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्टचे अध्यक्ष धनीराव भिवाजी, मॉरिशसमधील मराठी स्पिकिंग युनियनचे अध्यक्ष भालचंद्र गोविंद अशा अनेक उचचपदस्थ मराठी मंडळींशी दौऱ्याच्या निमित्ताने विविध विषयांवर रविंद्र चव्हाण यांनी चर्चा केली. 

Web Title : मॉरीशस में गूंजा महाराष्ट्र गीत, 'महाराष्ट्र भवन' का विस्तार शुरू

Web Summary : मॉरीशस में 'महाराष्ट्र भवन' के विस्तार के साथ मराठी संस्कृति का उत्सव मनाया गया। महाराष्ट्र गीत के साथ सांस्कृतिक कार्यक्रम में मराठी भाषा के संरक्षकों को सम्मानित किया गया। आशीष शेलार की पहल से मॉरीशियाई मराठी संगठनों को 'महा गणेशोत्सव 2025' के लिए अनुदान वितरित किए गए।

Web Title : Maharashtra's Anthem Echoes in Mauritius; 'Maharashtra Bhavan' Expansion Begins

Web Summary : Mauritius celebrated Marathi culture with the 'Maharashtra Bhavan' expansion groundbreaking. A cultural program, featuring Maharashtra's anthem, honored Marathi language preservationists. Grants for 'Maha Ganeshotsav 2025' were distributed to Mauritian Marathi organizations, facilitated by Ashish Shelar's initiative.