‘केईएम’च्या वसतिगृहाचा स्लॅब कोसळला; एक महिला जखमी, दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 06:40 AM2022-11-04T06:40:28+5:302022-11-04T06:40:35+5:30

एक महिला जखमी, दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

The slab of KEM hostel collapsed; A woman was injured, the issue of repairs is on the table again | ‘केईएम’च्या वसतिगृहाचा स्लॅब कोसळला; एक महिला जखमी, दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

‘केईएम’च्या वसतिगृहाचा स्लॅब कोसळला; एक महिला जखमी, दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Next

मुंबई : पालिकेच्या केईएम रुग्णालयात गुरुवारी सकाळी परिचारिका वसतिगृहाच्या सिलिंगचा काही भाग कोसळला. यात एक महिला जखमी झाली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा पालिका रुग्णालयातील वसतिगृहांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी केईएम रुग्णालय मानले जाते. रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय तसेच परिचारिका प्रशिक्षण केंद्रही  आहे, यात ३०० विद्यार्थिनी नर्सचे शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बनवण्यात आले आहे. १९२६ मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती. 

रुग्णालयात दुरुस्तीचे काम सुरू असेल तरी या हॉस्टेलची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. गुरुवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास परिचारिका विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहात जेवण बनवण्यासाठी संगीता चव्हाण (४०) या आल्या असता सिलिंगचा काही भाग कोसळला. यात चव्हाण यांच्या डोक्याला मार लागला आहे, तीन टक्के पार पडले आहेत. याआधीही फॅनसह स्लॅब कोसळला होता, अशी माहिती कोकीळ यांनी दिली.

सततच्या पाठपुराव्यानंतरही दुर्लक्ष

सिलिंगचा भाग कोसळताच तातडीने स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्या समवेत  परिस्थितीची पाहणी केली आणि तेथील विद्यार्थ्यांना दिलासा दिला. याबाबत तातडीची बैठक आयोजित करून त्वरित दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला सांगितले आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांची इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना केली आहे. दुरुस्तीबाबत गेले २ ते ३ वर्षे सतत पाठपुरावा केला आहे. त्यानंतरही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर पालिका प्रशासन आणि केईएम रुग्णालय प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: The slab of KEM hostel collapsed; A woman was injured, the issue of repairs is on the table again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.