पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाइल लांबविला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 14:27 IST2023-07-31T14:27:34+5:302023-07-31T14:27:54+5:30
याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस अज्ञात मोटरसायकलस्वारांचा पोलिस शोध घेत आहेत.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाइल लांबविला
मुंबई : टेम्पोचालकाला पत्ता विचारण्याचा बहाणा करत त्याच्या हातातील मोबाइल दोघा दुचाकीस्वारांनी लांबवल्याची घटना एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत शनिवारी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस अज्ञात मोटरसायकलस्वारांचा पोलिस शोध घेत आहेत.
प्रवीण गावडे (४९) हे व्यवसायाने टेम्पोचालक आहेत. ते शनिवारी गोरेगावच्या नेस्को परिसरात भाडे सोडून घरी येत होते. त्यादरम्यान मोटरसायकलवरील व्यक्तींनी टेम्पोला हात दाखवत थांबवले आणि दुर्गानगरमधील वाडी कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर हा पत्ता माहीत नसल्याचे गावडे यांनी सांगितले. गावडे मोटरसायकलस्वाराशी बोलण्यात व्यस्त असल्याचा फायदा घेत दुसऱ्या बाजूने एकाने टेम्पोच्या डॅशबोर्डवरचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल घेतला आणि धूम ठोकली. त्यानंतर ते दोघेही पवईमार्गे गेल्याने गेले. मोबाइल चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर टेम्पोचालकाने पोलिस ठाण्यात तक्रार केली.