'शिवशाही'चा लांब पल्ला, मुंबई ते गोवा धावणार ST; तिकीट दर घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 03:55 PM2022-12-22T15:55:07+5:302022-12-22T15:55:47+5:30

कोकणाला नयनरम्य निसर्गसौंदर्य लाभलं आहे. या सौंदर्यामुळे कोकणातील अनेक ठिकाणं पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाली आहेत.

The long distance of 'Shivashahi' will run from Mumbai to Goa; Do you know the ticket price? | 'शिवशाही'चा लांब पल्ला, मुंबई ते गोवा धावणार ST; तिकीट दर घ्या जाणून

'शिवशाही'चा लांब पल्ला, मुंबई ते गोवा धावणार ST; तिकीट दर घ्या जाणून

googlenewsNext

मुंबई - राजधानी मुंबई ते गोवा प्रवास क्रुझने करायला अनेकजण उत्सुक असतात. समुद्री मार्गाने पाण्यातून प्रवास करण्याची मजा काही औरच असते. मात्र, आता एसटी महामंडळाची आरामदायी बस म्हणून ओळख निर्माण केलेल्या शिवशाहीनेही मुंबई ते पणजी प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त एसटी महामंडळाकडून ही भेट देण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. 

कोकणाला नयनरम्य निसर्गसौंदर्य लाभलं आहे. या सौंदर्यामुळे कोकणातील अनेक ठिकाणं पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाली आहेत. येथील अनेक कुटुंबांचा चरितार्थ पर्यटनक्षेत्रावर अवलंबून आहे. कोकणातील या पर्यटनाला चालना देण्यासाठी आता अधिकची दळणवळण सुविधा गरजेची आहे. त्यामुळेच, नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या मुंबईकरांना आरामदायी भेट देण्यात आली आहे. मुंबई-गोवा मार्गावर आता ही शिवशाही धावणार आहे.