राष्ट्रवादीच्या नव्या ऑफिसची चावी हरवली, अजितदादानां राहावं लागलं कारमध्ये बसून, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 14:12 IST2023-07-04T14:12:02+5:302023-07-04T14:12:41+5:30
Ajit Pawar: अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केला असून, आज मुंबईमध्ये त्यांनी आपल्या पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उदघाटन केलं. मात्र या कार्यालयाच्या उदघाटनाला आले असताना अजित पवार यांचा काही काळ खोळंबा झाला.

राष्ट्रवादीच्या नव्या ऑफिसची चावी हरवली, अजितदादानां राहावं लागलं कारमध्ये बसून, त्यानंतर...
महाराष्ट्रामध्ये रविवारपासून घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. अजित पवार यांनी काही आमदारांना सोबत घेत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने शरद पवार यांना धक्का बसला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केला असून, आज मुंबईमध्ये त्यांनी आपल्या पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उदघाटन केलं. मात्र या कार्यालयाच्या उदघाटनाला आले असताना अजित पवार यांचा काही काळ खोळंबा झाला.
त्याचं झालं असं की, अजित पवार ज्या कार्यालयाचं उदघाटन करण्यासाठी आले त्या कार्यालयाची चावीच हरवली. त्यामुळे अजित पवार आणि त्यांच्या टिमला बराच काळ कार्यालयाबाहेर ताटकळत राहावे लागले. या बंगल्यामध्ये ठाकरे गटाचे नेत अंबादास दानवे राहायचे आणि त्यांचे पीए चावी घेऊन बेपत्ता झाले असल्याचा दावा करण्यात आला.
यादरम्यान, कार्यालयाबाहेर समर्थकांची गर्दी जमली, त्यानंतर या कार्यकर्त्यांनी धक्के मारून दरवाजा उघडला. त्यानंतर सर्वजणांनी नव्या कार्यालयात प्रवेश केला.