हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 11:39 IST2025-12-14T11:38:40+5:302025-12-14T11:39:11+5:30
धूळ, धुके आणि धूर यांच्या संयुक्त मिश्रणाने हवेत तयार होणान्या धुरक्याने मुंबईकरांचा श्वास कोंडला आहे.

हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
मुंबई: धूळ, धुके आणि धूर यांच्या संयुक्त मिश्रणाने हवेत तयार होणान्या धुरक्याने मुंबईकरांचा श्वास कोंडला आहे. मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वारंवार उपाययोजना करूनही मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा समाधानकारक किंवा चांगला नोंदविला जात नसल्याचे चित्र आहे. मुंबईची हवा चांगली नोंदविण्यात याती म्हणून सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले असून, नव्या वर्षात तरी मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येईल? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ३ डिसेंबर रोजी १९ आरएमसी प्लांट बंद केले. देवनार, गोवंडी येथील चार, तर ठाणे येथील ८, नवी मुंबई येथील ६. तर कल्याण येथील १ आरएमसी प्लांट बंद करण्यात आले. उत्पादन बंदीची कारवाई करण्यात आली.
'या' कारणांमुळे देशभरात प्रदूषणामध्ये वाढ
मुंबई किंवा महाराष्ट्रात नाहीतर संपूर्ण देशामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढते आहे. पीएम २.५ आणि पीएम १० चे प्रमाण जास्त आहे. धूलिकण, वाहनांमधून निघणारा धूर, जाळण्यात येणारा कचरा याचा परिणाम आणि उर्वरित घटक यामुळे प्रदूषणामध्ये वाढ होत आहे.
३२ ठिकाणी वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रे
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये मंडळाची ३२ ठिकाणी वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रे सुरू आहेत. त्यापैकी १४ केंद्रे मुंबईत आहेत, तर उर्वरित ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल आदी आहेत.
हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यासाठी मंडळाकडे एकूण २२ मोबाइल मॉनिटरिंग व्हॅन आहेत. ज्याद्वारे राज्यामध्ये गरजेनुसार वातावरणीय हवा गुणवत्ता तपासणी केली जाते.
२.५ मायक्रो मीटरपेक्षा अधिक सूक्ष्म प्रदूषक घटक
पीएम २.५ (फाईन पार्टिक्यूलेट मॅटर): हवेमध्ये आढळणारे सूक्ष्म प्रदूषक घटक, ज्यांचा व्यास २.५ मायकोमीटरपेक्षा अधिक नसतो. सूक्ष्म कण सहज फुप्फुसांपर्यंत पोहोचू शकतात. रक्तवाहिन्यांमध्ये जातात. परिणामी हृदय, मेंदू, इतर अवयवांना इजा पोहोचू शकते.
सर्व स्थानकांचे सर्वेक्षण
मुंबईत आयआयटीएम, महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची हवा मोजमाप करणारी यंत्रणा कार्यरत आहे. यंत्रणेतील कॅलिब्रेशन योग्य पद्धतीचे आहे का? याची पडताळणी करण्यासाठी मंडळ सर्व स्थानकांचे सर्वेक्षण करणार आहे.