अनैसर्गिक अत्याचाराचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल! शाळेतील मित्रांसोबत बर्थ डे पार्टीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 11:03 IST2023-07-29T11:03:29+5:302023-07-29T11:03:52+5:30

याप्रकरणी सध्या लंडनमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या तक्रारीवरून कफ परेड पोलिसांनी मित्राविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

'That' video of unnatural torture goes viral! Kind of like a birthday party with school friends | अनैसर्गिक अत्याचाराचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल! शाळेतील मित्रांसोबत बर्थ डे पार्टीतील प्रकार

अनैसर्गिक अत्याचाराचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल! शाळेतील मित्रांसोबत बर्थ डे पार्टीतील प्रकार

मुंबई : शाळेच्या मित्रांसोबत बर्थ डे पार्टीदरम्यान नशेत एका मित्राकडून झालेल्या अनैसर्गिक अत्याचाराचा व्हिडीओ तीन वर्षांनी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सध्या लंडनमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या तक्रारीवरून कफ परेड पोलिसांनी मित्राविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. 

कुलाबा येथील रहिवासी असलेली २० वर्षीय तरुणी सध्या लंडनमध्ये राहण्यास आहे. २०२० मध्ये मुंबईत आजी-आजोबांकडे राहण्यास असताना ही घटना घडली आहे.  २८ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांच्या शाळेच्या मित्राचा बर्थडे असल्याने सगळे त्याच्या कफ परेड येथील घरी गेले. त्यावेळी तरुणी १७ वर्षांची होती. बर्थ डे पार्टी दरम्यान सर्वांनी मद्यपान केले. याचदरम्यान एकाने दारूच्या नशेत बाथरूममध्ये तरुणीशी जवळीक साधत अनैसर्गिक संबंध ठेवले. 

यादरम्यान मुलीच्या नकळत तिचा व्हिडीओ काढला. हाच व्हिडीओ मित्राने स्नॅपचॅटवर शेअर केल्याचे दिसताच तरुणीला धक्का बसला. तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगून, तत्काळ पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

Web Title: 'That' video of unnatural torture goes viral! Kind of like a birthday party with school friends