उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी मोदींची प्रार्थना, राहुल गांधींच्याही शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 11:53 IST2018-07-27T11:52:51+5:302018-07-27T11:53:34+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचा आज 58 वा वाढदिवस आहे.

Thank you for the longevity of Uddhav Thackeray, Rahul Gandhi's good wishes | उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी मोदींची प्रार्थना, राहुल गांधींच्याही शुभेच्छा

उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी मोदींची प्रार्थना, राहुल गांधींच्याही शुभेच्छा

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचा आज 58 वा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा असे म्हणत ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

उद्धव ठाकरे आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यात येत आहेत. तर, वाढदिवसानिमित्त माझे कुठेही फ्लेक्स लावू नका, मुंबईच पर्यावरण जपा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे. तर राजकीय नेत्यांनी ट्विटवरवरुन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजप सरकार आणि मोदींवर नेहमीच कडाडून टीका करणाऱ्या उद्धव यांना मोदी आणि फडणवीस यांनीही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटवरुन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाजसेवेसाठी आपणास दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, असे ट्विट मोदींनी केले. तर राहुल गांधी यांनीही ट्विट करुन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदींकडून शुभेच्छा


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे ट्विट


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा



 

Web Title: Thank you for the longevity of Uddhav Thackeray, Rahul Gandhi's good wishes