तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, दिशा; अशी १५० शहरांसाठीची माहिती दिवसातील ८ वेळा होणार अद्ययावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 18:14 IST2020-05-28T18:14:00+5:302020-05-28T18:14:26+5:30

तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, दिशा अशी १५० शहरांसाठीची माहिती दिवसातील  ८ वेळा अद्ययावत केली जात असून, सूर्योदय, सूर्यास्त आणि चंद्र उदय, चंद्र सूर्याविषयीही माहिती नागरिकांना घरबसल्या मिळत आहे.

Temperature, humidity, air velocity, direction; Information for such 150 cities will be updated 8 times a day | तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, दिशा; अशी १५० शहरांसाठीची माहिती दिवसातील ८ वेळा होणार अद्ययावत

तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, दिशा; अशी १५० शहरांसाठीची माहिती दिवसातील ८ वेळा होणार अद्ययावत

 

मुंबई : तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, दिशा अशी १५० शहरांसाठीची माहिती दिवसातील  ८ वेळा अद्ययावत केली जात असून, सूर्योदय, सूर्यास्त आणि चंद्र उदय, चंद्र सूर्याविषयीही माहिती नागरिकांना घरबसल्या मिळत आहे. निमित्त आहे ते भारत सरकारने सुरु केलेल्या उमंग या मोबाइल अ‍ॅपचे. युनिफाइड मोबाइल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स (उमंग) चे उद्घाटन नुकतेच करण्यात आले असून, आयएमडीच्या संकेतस्थळावरील ७ सेवा उमंग अ‍ॅप्लिकेशनवर उपलब्ध आहेत.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) अद्ययावत साधने व तंत्रज्ञानावर आधारित हवामानाचा अंदाज आणि इशारा विषयक सेवांचा प्रसार सुधारण्यासाठी अलिकडच्या वर्षांत विविध उपक्रम राबविले आहेत. हा उपक्रम पुढे वाढविण्यासाठी आयएमडीने डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत उमंग अ‍ॅपचा वापर केला आहे. अल्पकालीन पूर्व अनुमाना अंतर्गत  स्थानिक हवामान घटनेविषयी आणि त्याच्या तीव्रतेचा इशारा आयएमडीच्या राज्य हवामान केंद्राद्वारे सुमारे ८०० स्थानके आणि भारतातील जिल्ह्यांसाठी तीन तास आधी  दिला जातो. 

जर हवामान जास्त प्रतिकूल असेल तर त्या बाबतीत, त्याचा प्रभाव देखील हवामानाच्या इशार्-यात  दिला जातो. शहराचा अंदाज या अंतर्गत देशातील सुमारे ४५० शहरांमधील मागील २४ तास आणि ७ दिवसाच्या हवामानाचा अंदाज दिला जातो. पर्जन्यवृष्टीच्या माहितीमध्ये देशभरातील सर्व जिल्ह्यातील पावसाची माहिती दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि संचयी मालिकेत उपलब्ध आहे. पर्यटनाचा अंदाजमध्ये देशातील जवळपास १०० पर्यटन स्थळांची मागील २४ तासातील आणि ७ दिवसातील हवामानाचा अंदाज वर्तविला जातो.
..........................

हवामानाचा इशारा
धोकादायक हवामानाविषयी नागरिकांना जागरूक करण्यासाठी इशारा दिला जातो. हवामानाच्या विविध धोकादायक पातळ्या दर्शविण्यासाठी  लाल, नारंगी आणि पिवळ्या रंगांचा वापर यासाठी करण्यात येतो. ज्यात लाल रंग हा सर्वात धोकादायक परिस्थिती दर्शविण्यासाठी म्हणून वापरतात. आगामी पाच दिवसांसाठी अशी माहिती सर्व जिल्ह्यांत दिवसातून दोनदा जारी केली जाते.

..........................

चक्रीवादळ
चक्रीवादळाचा इशारा आणि सतर्कता यामुळे चक्रीवादळाचा मागोवा घेता येतो. तसेच संभाव्य वेळ आणि किनारपट्टीच्या ओलांडण्याचा कालावधीही कळतो. प्रभाव आधारित इशारा, क्षेत्र / जिल्हानिहाय जारी केले जातो जेणेकरून असुरक्षित क्षेत्र रिकामे करण्यासह योग्य तयारी करता येते.

..........................

Web Title: Temperature, humidity, air velocity, direction; Information for such 150 cities will be updated 8 times a day