मनसेच्या महामोर्चाचे टिझर झळकले, घुसखोरांना दिला रोखठोक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 15:44 IST2020-02-05T15:43:02+5:302020-02-05T15:44:12+5:30
घुसखोरांविरोधात ९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला महामोर्चा भव्यदिव्य व्हावा यासाठी मनसेचे कंबर कसली आहे.

मनसेच्या महामोर्चाचे टिझर झळकले, घुसखोरांना दिला रोखठोक इशारा
मुंबई - मुंबईसह देशभरात असलेल्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात राज ठाकरेंच्यामनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच या घुसखोरांविरोधात ९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला महामोर्चा भव्यदिव्य व्हावा यासाठी मनसेचे कंबर कसली आहे. दरम्यान, मनसेच्या या मोर्चाचे टिझर सोशल मीडियावर प्रकाशित झाले आहेत. या टिझरमधून घुसखोरांना रोखठोक इशारा देण्यात आला आहे. तसेच अजून किती काळ आपण गाफील राहणार आहोत, असा सवालही विचारण्यात आला आहे.
...अजून किती काळ आपण गाफील राहणार आहोत? #मनसे_महामोर्चाpic.twitter.com/yLNhQQ8HI7
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 5, 2020
मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा टिझर शेअर करण्यात आला आहे. या टिझरच्या बॅकग्राऊंडला राज ठाकरेंच्या भाषणातील घुसखोरांच्या विरोधातील मुद्दे ऐकवण्यात येत आहेत. तसेच ही लढाई मोहल्ल्यातून देशविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात तसेच देश पोखरून टाकणाऱ्या वाळवीविरोधात आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, मनसेने काही दिवसांपूर्वीच वर्सोवा भागामध्ये असलेल्या बांगलादेशी घुसखोरांनात्यांच्या देशात निघून जाण्याचा इशारा दिला होता.विशेष म्हणजे वर्सोवा भागात असे इशारा देणारे पोस्टर लावण्यात आले होते.