Join us

राज्यातील शिक्षक, विद्यार्थ्यांना दिवाळीत मिळणार ऑनलाइन शिक्षणातून सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 06:39 IST

online education : राज्यातील ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या सर्व  विद्यार्थी, शिक्षकांना दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

मुंबई :   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळा बंद असल्या तरी दररोज ऑनलाइनशिक्षणाचे धडे शाळांकडून दिले जात आहेत. राज्यातील ऑनलाइनशिक्षण घेणाऱ्या सर्व  विद्यार्थी, शिक्षकांना दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाअभिवक्ता व संबंधित यंत्रणेशी चर्चा करून लवकरात लवकर अकरावीच्या महाविद्यालय प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल. ऑनलाइन अकरावी वर्गाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीत कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

टॅग्स :ऑनलाइनकोरोना वायरस बातम्याशिक्षणवर्षा गायकवाड