Taj hotel bomb threat! The system is alerted after receiving a call from Pakistan | ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी! पाकिस्तानातून फोन आल्याने यंत्रणा सतर्क

ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी! पाकिस्तानातून फोन आल्याने यंत्रणा सतर्क

मुंबई : मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवणार असल्याच्या धमकीच्या कॉलने मंगळवारी तपास यंत्रणांमध्ये खळबळ माजली. हा कॉल पाकिस्तानी क्रमांकावरून आला आहे. तो खरा आहे की खोटा, याचा तपास सुरू आहे.

ताज हॉटेलला सोमवारी रात्री फोन आला. फोनवर बोलणाऱ्याने २६/११ सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा करण्यात येणार असल्याची धमकी दिली. व्यवस्थापनाने त्याची पोलिसांना माहिती दिली. गुन्हे शाखा, राज्य दहशतवादविरोधी पथक व राज्य पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

पाकिस्तानच्या कराचीमध्ये स्टॉक एक्स्चेंजवर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला होता. तो हल्ला भारताच्या रॉ या गुप्तचर संघटनेने केल्याचा आरोप तेथील मंत्र्यांनी केला होता. त्यानंतर हा कॉल आला. त्यामुळे पोलिसांनी ताज हॉटेलबाहेरील सुरक्षा वाढवली आहे. पोलीस व हॉटेलच्या सुरक्षा यंत्रणेकडून हॉटेलमध्ये येणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच परिसरातील गस्तही वाढविण्यात आली आहे.

सिद्धिविनायक मंदिराबाहेरही सुरक्षेत वाढ
या धमकीनंतर मुंबईतील काही ठिकाणे व सिद्धिविनायक मंदिर परिसरातही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मंदिर प्रशासनालाही खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तेथील हालचालींवरही पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

नौदल, तटरक्षक दल अलर्ट
गेट वे आॅफ इंडिया व किनारपट्टीवरील गस्त व सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नौदल आणि तटरक्षक दलाला या कॉलचा अलर्ट देण्यात आला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Taj hotel bomb threat! The system is alerted after receiving a call from Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.