Join us

तलवार उगारणं पडलं महागात; अस्लम शेख, वर्षा गायकवाड आणि इम्रान प्रतापगढीवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 20:42 IST

Mumbai Police : मुंबई पोलीस आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये हा गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

मुंबई -  काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढ़ी यांच्या स्वागतासाठी शनिवारी सार्वजनिक कार्यक्रमात तलवारी उगारताना दिसल्याने पालकमंत्री अस्लम शेख आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड तसेच प्रतापगढी यांच्यावर मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये हा गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, भाजप नेते मोहित कंबोज यांनी 27 मार्च रोजी दोन्ही मंत्र्यांचे तलवारीसह छायाचित्र ट्विट केले होते आणि काही दिवसांपूर्वी तलवार फिरवल्याबद्दल मोहित कंबोज यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईपोलिसवर्षा गायकवाड