बांधकाम व्यवसायिकांना स्वामी 'प्रसन्न' !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 06:16 PM2020-07-25T18:16:00+5:302020-07-25T18:16:26+5:30

१८ प्रकल्पांसाठी ८,७६७ कोटींचा निधी; मुंबई ठाणे आणि पुण्याच्या सहा प्रकल्पांचा समावेश

Swami 'pleased' to builders! | बांधकाम व्यवसायिकांना स्वामी 'प्रसन्न' !

बांधकाम व्यवसायिकांना स्वामी 'प्रसन्न' !

googlenewsNext

मुंबई : कोरोनामुळे निर्माण झालेल्या अर्थिक संकटात बंद पडलेल्या बांधकाम प्रकल्पांमध्ये ऊर्जा फुंकण्यासाठी स्पेशल विंडो फाँर अफोर्डेबल अँण्ड मिड  इनकम हाऊसिंग फंडाचे (स्वामी) दार केद्र सरकारने उघडले आहे. गेल्या काही दिवसांत रखडलेल्या ८१ प्रकल्पांसाठी ८ हजार ७६७ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. त्यातून ६० हजार घरांचे काम मार्गी लागणार आहे. त्यात मुंबईतील चार आणि ठाणे पुण्यातील प्रत्येकी एक प्रकल्पाचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत सर्वाधिक निधी महाराष्ट्रातील प्रकल्पांना प्राप्त झाला आहे.

मध्यम आकाराच्या आणि परवडणा-या घरांच्या प्रकल्पांमध्ये जर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्या दूर करण्यासाठी नोव्हेंबर, २०१९ मध्ये केंद्र सरकारने स्वामी फंड उभारण्यास मान्यता दिली होती. त्यातून पहिल्या टप्प्यात किमान २५ हजार कोटी रुपये बांधकाम व्यावसायिकांना उपलब्ध होतील अशी आशा आहे. कोरोना संकटकाळात हा निधी तातडीने मंजूर करावा अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांच्या संघटना गेल्या दोन महिन्यांपासून करत आहेत. गेल्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी देशातील प्रकल्पांसाठी पाच हजार कोटींचे अर्थसहाय्य दिले असून त्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. मात्र, या निधीपेक्षा स्वामी फंडातील पैसे अधिक उपयुक्त ठरतील असे या संघटनांचे म्हणणे आहे. त्याची दखल घेत केंद्र सरकारने या निधीच्या वितरणास सुरूवात केली आहे.

३५३ प्रकल्पांचे मदतीसाठी साकडे : रिव्हाली पार्क (बोरिवली) नमन प्रिमियर (अंधेरी), जेम पँरडाईज (अंधेरी), विंडस्पेप अमोलिओ डीएननगर , मुंबई , अप्पर ठाणे (ठाणे) प्लेटोप रांजणगाव (पुणे) अशी अर्थसहाय्य मंजूर झालेल्या महाराष्ट्रातील बांधकाम प्रकल्पांची नावे आहेत. मंजूरी मिळालेल्या १८ पैकी सात प्रकल्पांना निधीचे वितरणही झाले आहे. तर, या योजनेअंतर्गत सहाय्य मिळविण्यासाठी ३५३ प्रकल्पांचे अर्ज केंद्र सरकारकडे दाखल झाले आहेत. त्याबाबतचे एक ट्विट देशाच्या अर्थमंत्री निर्णला सीतारामण यांनी केले आहे.

 

Web Title: Swami 'pleased' to builders!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.