Swabhimani Kolhapurkar does not need a begging; sambhajiraje on vinod tawade issue of flood fund | स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही, संभाजीराजेंचा विनोद तावडेंवर तीव्र संताप
स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही, संभाजीराजेंचा विनोद तावडेंवर तीव्र संताप

ठळक मुद्देछत्रपती संभाजी राजेंनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, विनोद तावडे हे आपल्या हातात एक डब्बा घेऊन सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी मदत मागताना दिसत आहेत.

मुंबई - छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भाजपा सरकार आणि मंत्री विनोद तावडेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवरन विनोद तावडे यांचा एक व्हिडीओ शेअर करत, छत्रपती संभाजीराजेंनी सरकारला लक्ष्य केलं. कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या महापुरात तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले, कित्येकांचे संसार पाण्याखाली गेले. मात्र, सरकारने हवी तेवढी मदत न दिल्याचा आरोप सर्वच स्तरातून होत आहे. त्याच पार्श्वभूमीर संभाजीराजेंनी विनोद तावडेंच्या मदत मागणी पद्धतीवरुन सरकारला लक्ष्य केलं. 

छत्रपती संभाजी राजेंनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, विनोद तावडे हे आपल्या हातात एक डब्बा घेऊन सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी मदत मागताना दिसत आहेत. त्यावेळी, एका माईकवरुन ते रस्त्यावरच सर्वांना मदतीचं आवाहन करताना दिसत आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आम्हाला कुणाच्या भिकेची गरज नसल्याचं म्हटलं आहे. 

''स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव ते काय? मी हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही. सर्वसामान्य महाराष्ट्रवासीयांचे प्रेम, कोल्हापूर, सांगलीकरांनी मनापासून स्वीकारलं आहे.'' असा मजकूर आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन लिहिला आहे. 

पाहा व्हिडीओ - 


Web Title: Swabhimani Kolhapurkar does not need a begging; sambhajiraje on vinod tawade issue of flood fund
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.