सुशांत आत्महत्या प्रकरण : पोलिसांनी माझा जबाब घेणे टाळाले - मितू सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 12:11 PM2020-07-30T12:11:54+5:302020-07-30T12:46:50+5:30

अभिनेता सुशांत सिंग राजपूत (३४) याची बहिण मीतु सिंग हिने वारंवार विनवण्या करून देखील दिड महिना उलटून देखील तिचा जबाब नोंदविण्यात आला नसल्याचे तिचे म्हणणे आहे.

Sushant suicide case: Police avoided taking my answer - Mitu Singh | सुशांत आत्महत्या प्रकरण : पोलिसांनी माझा जबाब घेणे टाळाले - मितू सिंग

सुशांत आत्महत्या प्रकरण : पोलिसांनी माझा जबाब घेणे टाळाले - मितू सिंग

Next

 

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई: अभिनेता सुशांत सिंग राजपूत (३४) याची बहिण मीतु सिंग हिने वारंवार विनवण्या करून देखील दिड महिना उलटून देखील तिचा जबाब नोंदविण्यात आला नसल्याचे तिचे म्हणणे आहे. मात्र तिला बोलावून देखील ती आली नसल्याचा दावा पोलिसांनी याआधी केल्याचे या प्रकरणातील गुंतागुंत अधिकच वाढत चालली आहे.

'मी मुंबई पोलिसांनी माझा जबाब नोंदविण्यासाठी वारंवार विनवण्या केल्या. रियाबद्दल मला सांगायचंय, सुशांत ज्या घरात राहत होता त्याबद्दल मला बोलायचंय असे मी वारंवार पोलिसांना सांगितले होते. मात्र पोलिसांनी सतत मला टाळलं', असे मितूचे म्हणणे आहे. पटना पोलीस आता सुशांतची माजी प्रेयसी अंकिता लोखंडे, तसेच मितूचा नोंदविणार आहेत. याप्रकरणी 'लोकमत' ने परिमंडळ ९ चे प्रमुख अभिषेक त्रिमुखे यांना विचारणा केली होती. तेव्हा त्याच्या बहिणीला चौकशीसाठी बोलविले आहे मात्र ती बाहेर असल्याने येऊ शकत नसल्याचे उत्तर तिने दिल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे रियाचा जबाब आठवडाभराने, डॉक्टरचा जबाब महिना भराने त्याची बहिण ¸मितूचा जबाब दिड महिन्यानंतरही का दाखल करण्यात आला नाही असा सवाल मुंबई पोलिसांवर उपस्थित केला जात आहे.

अंकिताने कुटुंबाला दिले पुरावे !
सुशांतच्या वडिलांना भेटण्यासाठी अंकिता दोन वेळा बिहारला गेली होती. त्यावेळी तिने काही पुरावे त्याच्या कुटुंबियांना सुपूर्द केल्याची माहिती आहे. ही कागदपत्रे पटना पोलिसांना दिल्यानंतर रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Sushant suicide case: Police avoided taking my answer - Mitu Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.