Join us

संजय राऊतांनी शिवसेनेचं खरं रूप दाखवलं; कंगना Vs. सेना सामन्यात बबिता फोगाटची उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 22:37 IST

मुंबईत येण्यापासून कंगनाला रोखण्याची कुणाची हिंम्मत नाही.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून अभिनेत्री कंगना राणौत आणि राज्य सरकारमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. कंगनानं ठाकरे सरकारसह मुंबई पोलिसांवर सातत्यानं निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत परतू नये यासाठी धमकी दिली होती, असा खळबळजनक आरोप करणाऱ्या कंगनाला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलीस आयुक्तांकडे जा आणि तुमच्याकडे असलेले पुरावे त्यांना द्या, असे राऊत म्हणाले. पण, राऊतांच्या टीकेवरून आता दंगल गर्ल बबिता फोगाटनं शिवसेनेवर टीका केली आहे. 

बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचं काही दिवसांपूर्वीच कंगनानं म्हटलं होतं. संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावादेखील तिनं केला आहे. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?,' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला. 

कंगना Vs सेना वादात आता दंगल गर्ल आणि भाजपाची सदस्य बबिता फोगाटनंही उडी मारली आहे. तिनं ट्विट करून शिवसेनेवर टीका केली. तिनं लिहिलं की,''कंगना राणौत ही हिंदुस्तानची कन्या आहे, मुंबईत येण्यापासून तिला रोखण्याची कुणाची हिंम्मत नाही. संजय राऊतांनी असं बोलून शिवसेनेचा खरं रुप दाखवलं. बॉलिवूडमधील घाण साफ करण्याची गरज आहे.'' 

IPL 2020 : CSKच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून सुरेश रैनाची हकालपट्टी; महेंद्रसिंग धोनीच्या हाती अंतिम निर्णय

IPL 2020 : आयपीएलमधील कोरोना सदस्यांचा आकडा 14 झाला, आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

टॅग्स :संजय राऊतबबिता फोगाटकंगना राणौतबॉलिवूड