Sushant Singh Rajput Case: State Human Rights Commission gives relief to Cooper Hospital, Mumbai Police | Sushant Singh Rajput Case : राज्य मानवाधिकार आयोगाकडून कूपर हॉस्पिटल, मुंबई पोलिसांना दिलासा

Sushant Singh Rajput Case : राज्य मानवाधिकार आयोगाकडून कूपर हॉस्पिटल, मुंबई पोलिसांना दिलासा

ठळक मुद्देचौकशीदरम्यान शवागारमध्ये सुशांतचा मृतदेह पाहण्यासाठी रिया चक्रवर्ती गेल्याचं समोर आलं  होतं असून या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणाला शवागारमध्ये जाण्यास मुभा नसते.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सीबीआयच्या तपासाची चक्रे वेगाने फिरत असून आज राज्य मानवाधिकार आयोगाकडून कूपर रुग्णालय आणि मुंबईपोलिसांना क्लीन चीट मिळाली आहे. सीबीआयच्या पथकाने कूपर रुग्णालयातील ज्या डॉक्टरांनी सुशांतचे पोस्टमॉर्टेम केले त्यांची चौकशी केली आहे. चौकशीदरम्यान शवागारमध्ये सुशांतचा मृतदेह पाहण्यासाठी रिया चक्रवर्ती गेल्याचं समोर आलं  होतं असून या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणाला शवागारमध्ये जाण्यास मुभा नसते. त्यामुळे रिया कशी गेली. मुंबई पोलिसांनी तिला परवानगी दिली होती की नाही यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यामुळे कूपर रुग्णालय प्रशासन आणि मुंबई पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली होती.


 सुशांतच्या शवाचे दर्शन घेण्यासाठी 14 जूनला रिया चक्रवर्ती रुग्णालयातील शवागृहात गेली होती. त्याबाबतचे वृत्त विविध वृत्तपत्र व वाहिन्यावरून प्रसारीत करण्यात आले होते. त्यावरून आयोगाने मुंबई पोलीस व रुग्णालयाच्या प्रशासनाला 'सुमोटो'  नोटीस बजाविली होती. मात्र दोन्ही यंत्रणानी तिला प्रवेश दिल्याबाबतचे वृत्त फेटाळून लावीत त्याबाबत प्रतिज्ञपत्रक सादर केले. आयोगाने ते मान्य करीत त्यांना क्लिनचिट दिली.


रियाला आता एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक झाली आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याची मुख्य संशयित अभिनेत्री रिया चक्रवती हिचा अमलीपदार्थ  सेवन व तस्करीत सहभाग असल्याचा संशय ईडीला तपासात आला.  तिच्या मोबाईल डाटा तपासणीतून त्यानुषंगाने काही माहिती मिळाली असून त्याच्या मुळापर्यत जाऊन तपास करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. रियाकडून जप्त केलेल्या दोन मोबाईलपैकी एकामधील व्हाट्स अप चॅटमध्ये अमली पदार्थाबाबत अस्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे ड्रग्जचे सेवन व ती मागविण्यात तिचा संबंध स्पष्ट झाला आहे,  या अनुषंगाने तपास केला जात आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

 

प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

 

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा

 

सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा

 

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 

Breaking : शिक्षकाचा वेतन मिळत नसल्याने आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न

 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant Singh Rajput Case: State Human Rights Commission gives relief to Cooper Hospital, Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.