Sushant Singh Rajput Case ( Marathi News ): दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिला आहे. दरम्यान, आता यावर दिशा सालियनच्या वडिलांच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. कायद्यासमोर या अहवालाचा काही अर्थ नाही आणि न्यायालय अजूनही या प्रकरणाची दखल घेऊ शकते आणि पुढील चौकशीचे आदेश देऊ शकते, असा दावा वकील निलेश ओझा यांनी केला.
आपला 'आयकॉन' देशद्रोही असू शकत नाही, औरंगजेब वादावर RSS ची थेट प्रतिक्रिया
वकील निलेश ओझा म्हणाले की, कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही, लोक खोट्या गोष्टी पसरवत आहेत. या अहवालाला काही अर्थ नाही. दिशाच्या मृत्यूच्या ६ दिवसांनंतर, सुशांत त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला.
वकील निलेश ओझा यांनी एएनआयशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "क्लोजर रिपोर्टनंतरही, न्यायालय आरुषी तलवार प्रकरणात घडल्याप्रमाणे खून प्रकरणाची दखल घेऊ शकते, अटक वॉरंट जारी करू शकते किंवा पुढील तपासाचे आदेश देऊ शकते.
दिशा सालियनच्या वडिलांची केस निलेश ओझा लढत आहेत. सतीश सालियान यांनी दिशाच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करण्याची आणि आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दिशा सालियन प्रकरणात दाखल केलेल्या रिट याचिकेवरील सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने २ एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे.
तपास सीबीआयने केला
दिशा सालियान ८ जून २०२० रोजी मृत अवस्थेत आढळली आणि काही दिवसांनी १४ जून २०२० रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृत आढळला. या दोन्ही मृत्यूंमुळे मोठा वाद निर्माण झाला होता, त्यानंतर तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
सीबीआयने दिला क्लोजर रिपोर्ट सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये सीबीआयने वेगवेगळे क्लोजर रिपोर्ट दाखल केले आहेत. सुशांत सिंहला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला. या प्रकरणी त्यांनी एक याचिका दाखल केली होती, तर दुसरा खटला अभिनेत्याची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीने त्याच्या बहिणींविरुद्ध दाखल केली होती.
सुशांतचे वडील केके सिंह यांनी दाखल केलेल्या प्रकरणात सीबीआयने पाटणा येथील विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला, तर दुसऱ्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट मुंबईतील विशेष न्यायालयात सादर करण्यात आला.