Sushant Singh Rajput: सुशांतच्या आत्महत्येमागे बॉलिवूड कनेक्शन? गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 10:49 PM2020-06-15T22:49:25+5:302020-06-15T22:50:29+5:30

सुशांतच्या पोस्टमोर्टमनुसार त्याने गळफास लावून आत्महत्या केली, त्याचसोबत त्याच्या शरीरात कोणताही नशेचा पदार्थ आढळला नाही.

Sushant Singh Rajput: Bollywood connection find behind suicide Says Home Minister Anil Deshmukh | Sushant Singh Rajput: सुशांतच्या आत्महत्येमागे बॉलिवूड कनेक्शन? गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले...

Sushant Singh Rajput: सुशांतच्या आत्महत्येमागे बॉलिवूड कनेक्शन? गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले...

Next

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर अनेक जण बॉलिवूडमधील गटबाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. बॉलिवूडमधील काही जणांच्या दबावामुळे सुशांतवर मानसिक तणाव आला. गेल्या ६ महिन्यापासून सुशांत डिप्रेशनच्या गोळ्या घेत होता, त्यानंतर अखेर तणावाखाली येऊन हरहुन्नरी कलाकाराने टोकाचं पाऊल उचलत गळफास लावून आत्महत्या केली.

आता या प्रकरणात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही भाष्य केले आहे. सुशांतच्या पोस्टमोर्टमनुसार त्याने गळफास लावून आत्महत्या केली, त्याचसोबत त्याच्या शरीरात कोणताही नशेचा पदार्थ आढळला नाही. त्याने डिप्रेशनमध्ये हे पाऊल उचललं पण मीडियाच्या रिपोर्टनुसार त्याच्या व्यावसायिक कारणामुळे त्याच्यावर तणाव आला का? या दृष्टीनेही पोलीस तपास करणार असं गृहमंत्री अनिल देशमुखांनी सांगितले.

या प्रकरणात बॉलिवूडमध्ये आपल्या परखड बोलण्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना राणौत हिनेही भाष्य केले आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर करण इंडस्ट्रीतील काही लोकांवर तिने गंभीर आरोप केले आहेत. सुशांतने मोठ मोठे सिनेमे केलेत पण त्याला एकही मोठा अवार्ड मिळाला नाही. इंडस्ट्रीत मुव्ही माफियांचे मुळं खोलवर रूजली आहेत. सुशांत त्याचाच बळी ठरला, असे कंगनाने म्हटले आहे. कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

तर दिग्दर्शक शेखर कपूर यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, तू ज्या दु:खातून जात होता त्याची मला जाणीव होती. ज्या लोकांनी तुला कमकुवत केले, ज्यांच्यामुळे तू माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन अनेकदा अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. त्यांची कहाणी मला माहिती आहे. जर मी मागील ६ महिने तुझ्यासोबत असतो, आपलं बोलणं झालं असतं. जे काही झालं त्यात तुझा दोष नाही तर त्यांचे कर्म होते. शेखर कपूर यांच्या पोस्टचा इशारा अनेकांकडे जातो. बॉलिवूडमध्येही चर्चा आहे की, सुशांतला टॉपच्या दिग्दर्शकांकडून काम दिलं जात नसल्याने तो हताश होता. काही मोठ्या बॅनर्ससोबत काम करतानाही सुशांतवर बंदी आणली होती. पण या केवळ चर्चा आहे याचे पुरावे कोणाकडेच नाहीत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर! बॉलिवूडवर भडकली कंगना राणौत

सुशांतच्या मृत्यूनंतर दिग्दर्शक शेखर कपूर यांचा रोख कोणाकडे?; मला माहिती होतं, तुझा दोष नव्हता, पण...

‘या’ लोकांमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी; मंत्री अशोक चव्हाणांचा थेट आरोप

काँग्रेस नेते मिलिंद देवरांचा मोठा खुलासा; माझ्याही मनात आत्महत्या करण्याचा विचार होता, पण...

 

Web Title: Sushant Singh Rajput: Bollywood connection find behind suicide Says Home Minister Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.