छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 23:12 IST2025-11-03T23:08:25+5:302025-11-03T23:12:39+5:30
मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मुंबईतील एशियन हॉर्ट इन्सिट्युट येथे उपचार सुरू आहेत.

छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला भुजबळांना देण्यात आला आहे.
भुजबळ यांना पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी त्यांना पुढील काही दिवस कोणालाही भेटता येणार नाही. प्रकृती स्थिर असून ते लवकरच पूर्णपणे बरे होऊन आपल्या कार्यात पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे.