विद्यार्थ्यांनी साकारला मेट्रो-३ मार्गिकेवरील स्थानकांचा आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 03:47 AM2019-11-26T03:47:33+5:302019-11-26T03:52:48+5:30

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमआरसीएल) करण्यात येत आहे.

The students create the plan of the stations on the Mumbai metro | विद्यार्थ्यांनी साकारला मेट्रो-३ मार्गिकेवरील स्थानकांचा आराखडा

विद्यार्थ्यांनी साकारला मेट्रो-३ मार्गिकेवरील स्थानकांचा आराखडा

Next

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमआरसीएल) करण्यात येत आहे. या मार्गिकेवर प्रस्तावित असलेली स्थानके कशी असतील याबाबतचा आराखडा तयार करण्याची संधी एमएमआरसीएलने विद्यार्थांना दिली होती. एमएमआरसीएलने यासाठी विद्यार्थ्यांकडून आराखडे मागवले होते. यातून आठ विद्यार्थांनी तयार केलेले उत्कृष्ट आराखडे निवडण्यात आले असून त्यांना पारितोषिकही जाहीर करण्यात आले आहे.

एमएमआरसीएल आणि आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ओआरएफ) यांनी मेट्रो-३ स्थानक परिसराच्या नावीन्यपूर्ण नियोजनासाठी घेतलेल्या स्पर्धेचा निकाल शुक्रवारी घोषित करण्यात आला. यामध्ये रचना संसद अ‍ॅकॅडमी आॅफ आर्किटेक्चर यांना प्रथम, पिल्लई कॉलेज आॅफ आर्किटेक्चर यांना द्वितीय तर रचना संसद अ‍ॅकॅडमी आॅफ आर्किटेक्चर (विनाअनुदानित) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्या संघांना शुक्रवारी एमएमआरडी येथे आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे रिअल टाइम प्रोजेक्टच्या डिझायनिंगमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

८ मार्च २०१९ रोजी मुंबई महानगरातील अभियंता आणि विद्यार्थ्यांसाठी दोन टप्प्यांत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ५१ संघ सहभागी झाले. प्रत्येक संघामध्ये ३ ते ५ सदस्यांचा समावेश होता. एमएमआरसीएल आणि ओआरएफने प्रकल्पाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी कार्यशाळा, साइट व्हिजिट आणि सहभागी संघासाठी ओरिएंटेशन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. एकूण १६ संघांना निवडून त्यातून अंतिम ८ संघांना विविध प्रकारांत पुरस्कृत करण्यात आले.

एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे याप्रसंगी म्हणाल्या की, एमएमआरसीएल नेहमीच नावीन्यपूर्ण कल्पना आणि नवीन संकल्पना राबविण्यात अग्रेसर असते. यामुळे भविष्यातील पायाभूत सुविधांच्या डिझाइन नावारूपास येताना अविश्वसनीय प्रतिभेचे धनी असलेले तरुण आमच्याबरोबर कार्य करतील. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अश्विनी भिडे यांनी या वेळी ओआरएफचे आभार व्यक्त केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

प्रथम - ६० हजार रुपये रोख, रचना संसद अ‍ॅकॅडमी आॅफ आर्किटेक्चर. अनुश्री शेट्टी, पार्थ बने, वैष्णवी अय्यर, सुमीत गवळी, सुशांत निखारे
द्वितीय- ४० हजार रुपये रोख, पिल्लई कॉलेज आॅफ आर्किटेक्चर. श्रेया राठोड, स्नेहल चौधरी, श्रेया मोहन, समीर हरहरे
तृतीय - ३० हजार रुपये रोख रचना संसद अ‍ॅकॅडमी आॅफ आर्किटेक्चर (विनाअनुदानित) अमेय कोडलकर, मानस केळुसकर, सुचेतन सोनवणे
लक्षणीय तपशील १० हजार रुपये रोख लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट अ‍ॅण्ड डिझाइन स्टडिज सिमरन ठाकूर, मिशेल वास, तन्वी शिंदे
सादरीकरण गुणवत्ता- १० हजार रुपये रोख भारती विद्यापीठ ईशानी प्रधान, सागर निपुर्ते, अलख सिंग, तेजस वैद्य
परिवर्तनीय संकल्पना १० हजार रुपये रोख, पिल्लई कॉलेज आॅफ आर्किटेक्चर पूर्वा गावडे, प्रणाली शाह, पीयूष मंडल
पादचारी आणि मोटार विहीन वाहतूक प्राधान्य - १० हजार रुपये रोख पिल्लई एचओसी कॉलेज आॅफ आर्किटेक्चर मोहित श्रीवास्तव, अनिरुद्ध कामरकर, जोएल डॅनियल
विशेष गती श्रेणी - १० हजार रुपये रोख - सीटीईएस कॉलेज आॅफ आर्किटेक्चर

Web Title: The students create the plan of the stations on the Mumbai metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.