Join us

चक्रीवादळाला १० महिने उलटूनही विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 01:51 IST

Education News : आधी चक्रीवादळ आणि नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी आणि सामान्य कुटुंबातील पालकांचे आर्थिक हाल झाले आहेत. त्यातच परीक्षा शुल्क माफीपासून वंचित  राहिल्याने अनेक होतकरू विद्यार्थ्यांची शिक्षणाची दारे बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबई -  क्यार व महा चक्रीवादळामुळे अवेळी आलेल्या पावसाने नुकसान झालेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे सन २०१९- २० मधील परीक्षा शुल्क महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार माफ केले होते. परंतु  त्यानंतर १३ डिसेंबर २०१९च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३४९ तालुक्यांमधील शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते, असे स्पष्ट करण्यात आले आणि त्यात वाढलेल्या २४ तालुक्यांतील विद्यार्थ्यांची यादी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे नसल्यामुळे अनेक पात्र विद्यार्थी परीक्षा शुल्क माफीच्या सवलतीपासून आजतागायत वंचित आहेत.आधी चक्रीवादळ आणि नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी आणि सामान्य कुटुंबातील पालकांचे आर्थिक हाल झाले आहेत. त्यातच परीक्षा शुल्क माफीपासून वंचित  राहिल्याने अनेक होतकरू विद्यार्थ्यांची शिक्षणाची दारे बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील या २४ तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सन २०१९- २० मधील परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी सुराज्य विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी अपर मुख्य सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग व संचालक उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्याकडे केली आहे. सदर प्रकरणी ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांऐवजी ३४९ आपद्ग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफीसंबंधी उचित आदेश निर्गमित करण्याबाबत कार्यवाही करण्याबाबतचे पत्र तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी अपर मुख्य सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडे केली आहे. 

परीक्षा शुल्कमाफीपासून वंचित तालुक्यांची यादी१) इंदापूर, हवेली (पुणे जिल्हा २ तालुके).२) करमाळा, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा (सोलापूर जिल्हा ४ तालुके)३) तलोदा, अक्कलकुआ (नंदुरबार जिल्हा २ तालुके)४) पतोदा, शिरूर (कसार), अष्टी, धारूर, (बीड जिल्हा ४ तालुके)५) कंरजा, अष्टी, (वर्धा जिल्हा दोन तालुके)६) नागपूर ग्रामीण, कामठी, पारशिवनी, मौदा, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, भिवापूर, व कुही (नागपूर जिल्हा १० तालुके).

टॅग्स :चक्रीवादळविद्यार्थीशिक्षणमहाराष्ट्र सरकार