सर्व मंडळाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दयावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 04:59 PM2020-06-04T16:59:00+5:302020-06-04T16:59:27+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीएसई मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्याची मागणी

Students from all board schools should be admitted to the next class | सर्व मंडळाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दयावा

सर्व मंडळाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दयावा

Next

 

 

मुंबई : देशातील व राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आयसीएसई आणि सीबीएसई मंडळांच्या परीक्षांचेकाही पेपर रद्द करण्यात आले होते, त्यांचे उर्वरित विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जुलैमध्ये या मंडळांच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा होणार आहेत. मात्र महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती आणि प्रादुर्भाव पाहता मंडळाकडून या परीक्षा रद्द केल्या जाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे, यासाठी पालक संघटना आणि विदयार्थी संघटना पुढे सरसावल्या असून नो डिटेन्शन पॉलिसी तत्त्वावर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा आणि इतर वर्गाच्या परीक्षा रद्द करून सरासरी गुण देण्यात यावे अशी मागणी होत आहे.

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याच विद्यार्थ्यांची परीक्षा या परिस्थितीत घेणे म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक आहे. राज्य मंडळाच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यंदा सरासरी गुणांच्या आधारवर पुढच्या वर्गात पाठविण्यात आले आहे तर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी ही सरासरी गुणांचा आधार घेण्यात आला आहे. तर दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. याचप्रमाणे इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही केंद्रीय मंडळाने निर्णय घ्यावा अशा मागण्या पालकांकडून होत आहेत. या पार्श्वभूमीवर युवासेनेमार्फत दहावीच्या उर्वरित परीक्षेच्या पेपर रद्द करण्याबाबत आयसीएसई  संलग्न शाळांच्या प्रतिनिधी / प्राचार्यांशी चर्चा केली आणि म्हणूनच महाराष्ट्रातील कोविडची चालू परिस्थितीमुळे परीक्षा रद्द करण्यासाठी केंद्रीय मंडळाच्या सचिव यांना औपचारिक पत्र लिहिण्याची अंगणी करण्यात आल्याची माहिती युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी दिली.

सध्यस्थितीत विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे इतर देशातील प्रत्येक राज्याच्या राज्य मंडळ व इतर मंडळाच्या शाळांनी सध्यस्थितीत विद्यार्थ्यांना नो डिटेन्शन पॉलिसीचा वापर करत पुढील वर्गात प्रवेश द्यायला हवा. परीक्षा झाल्या तरी अशा भयावह परिस्थितीत किती विद्यार्थ्यांना पालक पाठविणार हा प्रश्न उभा राहतोच त्यामुळे या शैक्षणिक वर्षांत शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यायला हवे असे मत इंडिया वाईड पेरेंट्स असोसिएशनच्या अनुभा सहाय यांनी व्यक्त केले.

Web Title: Students from all board schools should be admitted to the next class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.