कोरोना काळातील देवेंद्र फडणवीस यांची धडपड पुस्तकबद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 02:53 IST2020-11-01T02:46:05+5:302020-11-01T02:53:14+5:30
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सामाजिक कार्यावर आधारित ‘जनसेवक’ या विशेषांकाचे प्रकाशन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते शनिवारी झाले.

कोरोना काळातील देवेंद्र फडणवीस यांची धडपड पुस्तकबद्ध
मुंबई : कोरोनाच्या सात महिन्यांच्या संकटकाळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सामाजिक कार्यावर आधारित ‘जनसेवक’ या विशेषांकाचे प्रकाशन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते शनिवारी झाले.
देवेंद्र फडणवीस यांनी या काळात केलेले सर्व कोरोनाग्रस्त जिल्ह्यांचे दौरे, कोरोनाग्रस्तांची व त्यांच्या नातेवाइकांची केलेली विचारपूस, राज्य सरकारला कोरोनाच्या उपायांबाबत केलेल्या सूचना आणि वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केलेले आरोप तसेच विविध प्रकारच्या केलेल्या सूचना यांचा या विशेषांकात समावेश करण्यात आला आहे. यानिमित्त आयाेजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, नेत्या चित्रा वाघ, ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे, विश्वास पाठक आदी उपस्थित होते.