Join us

... त्यांच्या भक्कम साथीमुळेच बळ मिळते, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नानांची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 14:27 IST

आमच्या लग्नाचा आज वाढदिवस, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना पत्नीची खुप मोलाची साथ मिळत राहिली आणि यापुढेही मिळत राहील याबद्दल त्यांचे खुप खुप आभार.

ठळक मुद्देनाना पटोले हे काँग्रेसमधील आक्रमक आणि बेधडक नेतृत्व मानलं जातं. राजकारण आणि समाजकारण करताना घराकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं.

मुंबई - काँग्रेसचे डॅशिंग नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची माहिती देताना, त्यांच्या पत्नीबद्दल भावूक पोस्टही लिहिली आहे. आजपर्यंत त्यांच्या मिळालेल्या भक्कम साथीमुळेच लाखो लोकांच्या समस्या सोडविण्याचे बळ मिळते, असे नानांनी म्हटले आहे. नाना पटोले यांच्यातील हळव्या माणसाचं दर्शन त्यांच्या या शुभेच्छापर पोस्टमधून घडतं.  

आमच्या लग्नाचा आज वाढदिवस, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना पत्नीची खुप मोलाची साथ मिळत राहिली आणि यापुढेही मिळत राहील याबद्दल त्यांचे खुप खुप आभार. त्यांच्या भक्कम साथी मुळेच मतदारसंघातील व राज्यातील लाखो लोकांच्या समस्या प्रश्न जाणून त्या सोडवण्यासाठी बळ मिळते. समाजकारण आणि राजकारण करत असताना जनता हेच माझे प्रथम कुटुंब हे मी मानत आलो आहे. त्यामुळेच कदाचीत कुटुंबासाठी जास्त वेळ देता येत नाही. त्याबद्दल पत्नी म्हणून कोणतीही तक्रार न करता माझ्या पाठीशी खंभीरपणे उभ्या राहणाऱ्या धर्मपत्नी आपणास वैवाहिक जीवनातील या सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा... अशी पोस्ट नाना पटोले यांनी ट्विटरवरुन केली आहे. 

नाना पटोले हे काँग्रेसमधील आक्रमक आणि बेधडक नेतृत्व मानलं जातं. राजकारण आणि समाजकारण करताना घराकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं. पण, समाजासाठी काम करणाऱ्या आपल्या माणसाच्या पाठिशी खंबीरपणे राहिलं पाहिजे, हे नानांच्या पत्नीनं आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. त्यामुळेच, नानांनी आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जाहीरपणे भावूक पोस्ट लिहून आपल्या अर्धांगीणीस लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.   

टॅग्स :नाना पटोलेलग्नकाँग्रेस