Join us
Daily Top 2Weekly Top 5

तबलिगी-ए-जमातच्या साथीची राज्यभरात शोध मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 01:46 IST

इस्लाम धर्मात तबलिग जमातला मानणाऱ्यांची संख्या दिवसोदिवस वाढत आहे.

- जमीर काझी मुंबई : दिल्लीतील निजामुद्दीन मर्कज मधून राज्यात विविध जिल्ह्यात धार्मिक कार्यानिमित्य प्रवास केलेल्या तबलिग जमातमधील नागरिकांची शोध मोहीम युध्दस्तरावर सुरू करण्यात आली आहे.संबंधित मुस्लिम बांधवांची स्थानिकस्तरावर माहिती घेऊन वैद्यकीय तपासणी करून त्यांचे सामाजिक विलीगीकरण केले जात आहेत.त्यासाठी प्रत्येक जिल्ह्णातील तबलिग जमातशी संपर्क साधून त्याबाबतची कार्यवाही केली जात आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयसवाल यांनी सर्व पोलीस घटकप्रमुखांना निर्देश दिले आहेत. तबलिग जमातमध्ये काही परदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यांचीही तपासणी करून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.त्यासाठी तबलिग जमातचे साथीही सहकार्य करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

इस्लाम धर्मात तबलिग जमातला मानणाऱ्यांची संख्या दिवसोदिवस वाढत आहे. प्रेषित मंहमद पैंगबर याच्या शिकवणी प्रमाणे आचरण पध्दती आणि साधी रहाणीला यामध्ये महत्व दिले जाते. त्याचे जगातील मुख्यालय दिल्लीतील निजामुद्दीन मशीदीतून चालते. तेथे इज्तेमासाठी सहभागी झालेल्या आणि गेल्या ३ ,४ आठवड्यापासून तेथून आलेल्या सर्व नागरिक,परदेशी नागरिकांचा शोध घेवून वैद्यकीय तपासणी केली जात आहे .

त्यासाठी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार मंगळवार सकाळपासून मोहीम राबविण्यात आली. स्थानिक विशेष शाखेच्या मार्फत संबंधित जिल्हा तबलिग कमिटीशी संपर्क साधून इकडून जमात मध्ये गेलेल्या आणि तेथून आलेल्या मुस्लिम बांधवाची यादी घेवून शोध घेतला जात आहे. ते ज्या ठिकाणी थांबले आहेत,तेथून त्यांना आणि त्यांच्या सहवासात आलेल्याची रूग्णालयात नेऊन चाचणी घेण्यात आली. त्यांना विलीगीकरण (होम क्वारटाईन ) करण्याची व्यवस्था केली जात आहे.

निश्चित संख्या स्पष्ट होणे कठीण

च्निजामुद्दीन तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील सहभागी झालेल्याची नेमकी संख्या स्पष्ट होणे तूर्तास कठीण असल्याचे सांगण्यात आले.मुंबई ,ठाणे ,मुंब्रा ,पुणेसह मराठवाडा खान्देश याठिकाणी साथी गेले आहेत, त्यामध्ये पुणे विभागातील १८२ जणाची नावे मिळाली आहेत. त्यापैकी १०६ जणांना शोधण्यात आले आहे.

च्त्याशिवाय राज्याबाहेरील ५१ जण मिळून आले आहेत. या सर्वांची तपासणी करण्यात आली आहे. स्त्राव नमूने घेतले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही केली जाणार आहे. तोपर्यत त्यांना स्वतंत्र ठिकाणी ठेवण्यात आले आहे राज्. मुंबई,ठाणे याठिकाणीही जवळपास इतकीच संख्या असण्याची शक्यता आहे.

अफवेवर विश्वास ठेवू नका

कोरोनाविरूध्दची लढाई ही मानवजातीकडून एकत्रितपणे लढली जात आहे. त्यात विशिष्ट धर्माविरूध्द टीका करून अफवा पसरवू नका, नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, अप्पर महासंचालक रजनीश सेठ यांनी केले आहे.

परदेशी नागरिकांकडे व्हिसा

तबलिग जमातसाठी बांग्लादेश, इंडोनेशिया आदी ठिकाणाहून पाच यात्रेकरू आहेत, त्यांच्यकडे पासपोर्ट ,व्हिसा असून रितसर मान्यतेने ते आल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

च्नवी दिल्ली येथे झालेल्या तबलिगी जमात कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातून १६१ जण सहभागी झाले होते. त्यातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील बहुतेक आपल्या शहरात परतले असून त्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी तसेच ते ज्यांच्या संपर्कात आले होते त्यांचा शोध पोलीस आणि संबंधित आरोग्य यंत्रणा घेत आहे.

शहरातील तबलिगी समाजाच्या व्यक्तींचा शोध सुरु

नवी मुंबई - दिल्लीतील कार्यक्रमाच्या माध्यमातून तबलिगी समाजाच्या व्यक्तींमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या अनुशंघाने नवी मुंबईतील स्थायिक अथवा दिल्लीतून आलेल्या तबलिगी समाजाच्या व्यक्तींचा शोध सुरु आहे. दिल्ली येथे तबलिगी समाजाच्या वतीने एका धार्मिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होतं. या कार्यक्र मास देश-परदेशातून धर्मगुरु व अन्य नागरिक उपस्थित झाले आहे. त्यापैकी काहींना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात असून काही राज्यात तसे संशयीत आढळून आले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याभारतमहाराष्ट्र