मुंबई : उत्तर भारतात निर्माण झालेला पश्चिमी विक्षोभ आणि समुद्राहून म्हणजे पश्चिम दिशेकडून जमिनीवर वाहणारे आर्द्रतायुक्त वारे; यांचा संयुक्ति परिणाम म्हणून पुढील आठवडाभर राज्यभरात अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरू राहणार आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसासोबत गारपिटीची शक्यताही हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.
शुक्रवारी सांताक्रूझ येथे तापमान ३७ होते. यात ४ ने घट झाली असून हवामानात अचानक बदल जाणवत आहे. शनिवारी सकाळी १०:४५ वाजता मुंबईत तापमान सुमारे ३१ आणि आर्द्रता ६० टक्के होती. त्यामुळे नागरिकांना उष्ण आणि दमट वातावरण जाणवत होते.
२९ आणि ३० मार्च रोजी महामुंबईतवरही ढग दाटून येतील. मुंबईसह लगत हलक्या पावसाची शक्यता आहे. तर राज्यभरात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दुपारसह संध्याकाळी या काळात गारपिटीचीही शक्यता आहे- अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक
३०, ३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहू शकतात. दक्षिण कोकणात मेघगर्जना होण्याची शक्यता आहे- कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान, शास्त्रज्ञ
Web Summary : Maharashtra faces unseasonal rain and hailstorms next week, especially in central regions, Marathwada, and Vidarbha. Mumbai may experience light rain. Expect thunderstorms and gusty winds up to 50 kmph across many districts from March 30th to April 1st.
Web Summary : महाराष्ट्र में अगले सप्ताह बेमौसम बारिश और ओलावृष्टि की आशंका है, खासकर मध्य महाराष्ट्र, मराठवाड़ा और विदर्भ में। मुंबई में हल्की बारिश हो सकती है। 30 मार्च से 1 अप्रैल तक कई जिलों में गरज और 50 किमी प्रति घंटे तक की तेज हवाएं चलने की संभावना है।