क्रिकेट आयोजकांवर राज्य सरकार मेहरबान, बंदोबस्ताच्या दरात ६० लाखांपर्यंत कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 12:15 PM2023-06-27T12:15:48+5:302023-06-27T12:16:35+5:30

Cricket Matches: करोडोची कमाई करणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या आयोजकांवर सरकार भलतेच मेहरबान झाले आहे. क्रिकेट सामन्यांसाठी लावण्यात येणाऱ्या पोलिस बंदोबस्ताच्या दरात मोठ्या प्रमाणात घट करण्यात आली आहे.

State government favors cricket organisers, reduction in endowment rates up to 60 lakhs | क्रिकेट आयोजकांवर राज्य सरकार मेहरबान, बंदोबस्ताच्या दरात ६० लाखांपर्यंत कपात

क्रिकेट आयोजकांवर राज्य सरकार मेहरबान, बंदोबस्ताच्या दरात ६० लाखांपर्यंत कपात

googlenewsNext

मुंबई : करोडोची कमाई करणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या आयोजकांवर सरकार भलतेच मेहरबान झाले आहे. क्रिकेट सामन्यांसाठी लावण्यात येणाऱ्या पोलिस बंदोबस्ताच्या दरात मोठ्या प्रमाणात घट करण्यात आली आहे. शुल्कात वाढ करण्याऐवजी सहा वर्षांनी हे दर थेट ३५ लाखांपासून ६० लाखांपर्यंत कमी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्य सरकारने २०१८-१९ नंतर म्हणजे तीन वर्षांनी नवीन दर जाहीर करताना मोठ्या प्रमाणावर सूट देण्यात आली आहे. दरवर्षी मार्चनंतर म्हणजे साधारण जून महिन्यात हे दर जारी केले जातात.  कोरोना महामारीची दोन वर्षे असल्याने मधल्या काळात या दरात बदल करण्यात आला नव्हता.   

किती असेल दरकपात?
टी-२० - ६० लाख रुपये 
एकदिवसीय - ५० लाख रुपये 
कसोटी - ३५ लाख रुपये   

कपात मागील १२ वर्षांपासून लागू
सरकारने २०१८-१९ साली २०१६-१७च्या दरात चार ते पाच लाख रुपयांनी कपात केली होती. पूर्वी मुंबईसाठी वेगळे दर तर नवी मुंबई, पुणे, नागपूरसाठी वेगळे दर होते. मात्र, आता सरसकट एकच दर ठेवण्यात आले आहेत. सरकारने ही दरकपात थेट २०११ पासून लागू केली आहे. यामुळे आयोजकांना आधी भरलेले बंदोबस्ताचे अतिरिक्त पैसेही परत मिळतील.

पोलिस बंदोबस्ताचे दर
वर्ष    २०१६-१७     २०१८-१९     २०२०-२०२४
टी-२०    ६६ लाख रुपये     ७० लाख रुपये     १० लाख रुपये
एकदिवसीय    ६६ लाख रुपये     ७५ लाख रुपये     २५ लाख रुपये
कसोटी    ५५  लाख रुपये     ६० लाख रुपये     २५ लाख रुपये

नागपूर, पुणे, नवी मुंबईसाठी दर
वर्ष     २०१६-१७     २०१८-१९
टी-२०    ४४ लाख रुपये     ५० लाख रुपये
एकदिवसीय    ४४ लाख रुपये    ५० लाख रुपये 
कसोटी    ३८.५० लाख रुपये    ४०  लाख रुपये

Web Title: State government favors cricket organisers, reduction in endowment rates up to 60 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.