Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टँडअप कॉमेडियनने केली छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा; सोशल मीडियात संतापाची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 12:34 IST

मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाबद्दल अग्रिमा जोशुआने विनोदातून टीका केली.

मुंबई  - स्टँड-अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिच्याविरोधात सध्या सोशल मीडियात संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विनोदामुळे नेटिझन्सने तिच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अग्रिमा जोशुआने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या असून तिच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी सोशल मीडियात जोर धरु लागली आहे.

मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाबद्दल अग्रिमा जोशुआने विनोदातून टीका केली. ही टीका करताना तिने शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेख केला तसेच त्यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरले. अग्रिमा म्हणाली की,  “शिवाजी या पुतळ्याबाबत अधिक माहिती जाणण्यासाठी मी गुगलवर Quora इंटरनेट सोर्सवर गेली तर कोणीतरी निबंध लिहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शिवाजी पुतळ्याचा मास्टरस्ट्रोक आहे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल, दुसऱ्या एकाला वाटलं काहीतरी क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, तो म्हणाला, या जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार आहे शिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल. तर तिसरा व्यक्ती येऊन सांगतो, शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, बस्स मी त्यालाच फॉलो केलं” अशा शब्दात अग्रिमाने विनोद केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ट्विटरवर याबाबत नाराजी पसरली असून महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी या स्टँड-अप कॉमेडियनवर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु अशा तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत असून त्यांच्याबद्दल अशी थट्टा अजिबात सहन केली जाणार नाही. या शिवाजी महाराजांनी सर्व जातींना एकत्र करत स्वराज्य निर्माण केले. त्यांच्यावर असा विनोद करणे संतापजनक आहे अशा भावना ट्विटरवर युजर्सने मांडल्या आहेत. याबाबत ट्विटरवर शिवाजी महाराज असा हँशटॅग ट्रेंड होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्माचे राजा होते, त्यांच्यामुळे मुघल काळात मंदिरं वाचली, पण या स्टँड-अप कॉमेडियन अशाप्रकारे विनोद करुन अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत, हिला कठोर शिक्षा करावी अशी मागणी एका युजर्सने केली आहे.

तर युवासेनेतून बाहेर पडलेले रमेश सोलंकी यांनी कोट्यवधी लोकांच्या भावना अग्रिमा जोशुआच्या स्टँड-अप कॉमेडीने दुखावल्या असून तिच्याविरोधात कडक कारवाई करावी असी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई पोलीस आयुक्त यांना ट्विटरवरुन केली आहे.

टॅग्स :सोशल मीडियाछत्रपती शिवाजी महाराजपोलिसनरेंद्र मोदी