ST Worker Strike : "आम्ही पाकिस्तानातून आलो नाही, महिलांना पोलीस धक्काबुक्की करतायेत", आंदोलक महिलेचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 17:02 IST2022-04-08T16:23:20+5:302022-04-08T17:02:32+5:30
ST Strike : महिला आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली असून महिला पत्रकाराला देखील ढकलून दिल्याचा एका महिला आंदोलनकर्त्याने आरोप केला आहे. पूढे ती महिला म्हणाली, अशी वागणूक द्यायला, आम्ही पाकिस्तानातून आलो नाही.

ST Worker Strike : "आम्ही पाकिस्तानातून आलो नाही, महिलांना पोलीस धक्काबुक्की करतायेत", आंदोलक महिलेचा आरोप
मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन(ST Workers Strike) संपले असे वाटत असताना आज पुन्हा एकदा चिघळले आहेत. शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून चप्पलफेल करण्यात आले. तसेच, शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अचानकपणे झालेल्या या आंदोलनासमोर पोलिसही हतबल झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्कुल बसमधून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे गेले आहेत. मात्र, महिला आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली असून महिला पत्रकाराला देखील ढकलून दिल्याचा एका महिला आंदोलनकर्त्याने आरोप केला आहे. पूढे ती महिला म्हणाली, अशी वागणूक द्यायला, आम्ही पाकिस्तानातून आलो नाही.
या आंदोलनाची तीव्र परिस्थिती पाहता मुंबई पोलीस दलाचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील हे देखील घटनास्थळी दाखल झाले. आंदोलनाने उग्र रूप घेतले असून एनसीपीचे कार्यकर्ते देखील सिल्वर ओकबाहेर जमा झाले असून त्यांनी भाजपा आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाल्याचं एनसीपी कार्यकर्ते आरोप करत आहेत. या आंदोलनाप्रकारणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या चर्चा सुरु आहे.
मुंबई- शरद पवारांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन; जोरदार घोषणबाजी https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/E723iW3ns1
— Lokmat (@lokmat) April 8, 2022