एसटीत १०० टक्के मराठी भाषाच हवी, महामंडळाचे परिपत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 02:43 AM2020-07-11T02:43:53+5:302020-07-11T07:21:44+5:30

मराठी भाषेचा वापर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे एका वर्षाकरिता वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

ST needs 100 percent Marathi language, Mahamandal's circular | एसटीत १०० टक्के मराठी भाषाच हवी, महामंडळाचे परिपत्रक

एसटीत १०० टक्के मराठी भाषाच हवी, महामंडळाचे परिपत्रक

Next

मुंबई : एसटी महामंडळात कार्यालयीन पातळीवर राजभाषा मराठीचा वापर १०० टक्के करावा, असे परिपत्रक एसटी महामंडळाकडून राज्यभरातील विभाग नियंत्रकांना पाठविण्यात आले आहे.

मराठी भाषेचा वापर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या  अधिकारी आणि कर्मचारी यांचे एका वर्षाकरिता वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात येणार आहे. मराठीचा वापर करण्यास न करणाºया सरकारी कर्मचाऱ्यांची एक वर्ष वेतनवाढ रोखण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर एसटीनेदेखील गुरुवारी परिपत्रक काढले आहे. अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला मराठीचा वापर १०० टक्के करण्याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास परिपत्रकाद्वारे सांगितले आहे. मराठी भाषेचा वापर न करणाºया किंवा टाळाटाळ करणाºया अधिकारी आणि कर्मचारी यांना लेखी ताकीद देणे, गोपनीय अहवालात नोंद घेणे, ठपका ठेवणे आणि एक वर्षाकरिता वेतनवाढ रोखणे अशा कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व विभागप्रमुखांना सूचनांची अंमलबजावणी करण्यास सांगितले.

Web Title: ST needs 100 percent Marathi language, Mahamandal's circular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.