Join us

ST Employees: एसटी कर्मचाऱ्यांना ३४% महागाई भत्ता, दर महिन्याला ६ टक्के वाढ हाेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 08:19 IST

ST Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही ३४ टक्के महागाई भत्ता देण्याच्या प्रस्तावास अखेर बुधवारी सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात महिन्याला सहा टक्के वाढ होईल.

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही ३४ टक्के महागाई भत्ता देण्याच्या प्रस्तावास अखेर बुधवारी सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात महिन्याला सहा टक्के वाढ होईल. या महागाई भत्ता वाढीमुळे महामंडळावर महिन्याला १८ कोटींचा अतिरिक्त भार पडेल. याचा लाभ महामंडळातील ८९ हजार कर्मचाऱ्यांना मिळेल. सध्या एसटी कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता मिळतो.  

गेल्या वर्षी दिवाळीदरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता मिळाला होता. नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ झाली. तो ३४ टक्के झाला. याच धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांनाही ३४ टक्के महागाई भत्ता द्यावा, यासाठी राज्य सरकारकडे महामंडळाने तीन महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठविला होता. त्यावर सरकारने बुधवारी याबाबत निर्णय घेतला. 

आजवर काय घडले?n एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता दिला जातो. n प्रलंबित महागाई भत्ता मिळावा, म्हणून कामगार संघटना मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेत होत्या. n सलग तीन वेळा कामगार संघटनांनी भेटी घेतल्या होत्या. 

याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. प्रलंबित महागाई भत्ता मिळावा, असा आमचा आग्रह होता. मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य करत, तशा सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या, शिवाय अतिरिक्त मुख्य सचिवांनी अंतिम मंजुरीसाठी फाइल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविली होती. त्याला बुधवारी मंजुरी मिळाली.    - संदीप शिंदे, अध्यक्ष,     महाराष्ट्र एसटी कामगार संघटना.

टॅग्स :एसटीकर्मचारीमहाराष्ट्र सरकार