Join us

एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवापूर्वी मिळणार पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 07:44 IST

ST employees: राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन गणपती उत्सवापूर्वी दिले जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.

मुंबई - राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन गणपती उत्सवापूर्वी दिले जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.

एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा महिन्याच्या ७ तारखेपासून १० तारखेच्या दरम्यान होतो. परंतु यंदा गणपती उत्सव ऑगस्टच्या शेवटी आल्याने वेतनामुळे कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या उत्सवाच्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून एसटीच्या विविध सवलती पोटीची प्रतिपूर्ती रक्कम लवकर देण्याची विनंती एसटी महामंडळाने सरकारला केली आहे. त्यानुसार सोमवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.  

टॅग्स :एसटीकर्मचारीमहाराष्ट्र सरकार