राज्यात आजपासून एसटी बस धावणार, सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 02:28 AM2020-05-22T02:28:19+5:302020-05-22T06:08:02+5:30

लॉकडाऊनच्या चौथ्या कालखंडामध्ये राज्य शासनाने एसटी महामंडळाला दिलेल्या परवानगीनुसार जिल्ह्यातील निवडक मार्गांवर एसटी बससेवा सुरू होत आहे.

ST buses will run in the state from today | राज्यात आजपासून एसटी बस धावणार, सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत सेवा

राज्यात आजपासून एसटी बस धावणार, सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत सेवा

Next

मुंबई : रेड व कंटेन्मेंट झोन वगळता इतर विभागांमध्ये काही अटी-शर्तींच्या अधीन राहून शुक्रवारपासून जिल्हांतर्गत एसटी बससेवा सुरू होणार असल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी दिली.
लॉकडाऊनच्या चौथ्या कालखंडामध्ये राज्य शासनाने एसटी महामंडळाला दिलेल्या परवानगीनुसार जिल्ह्यातील निवडक मार्गांवर एसटी बससेवा सुरू होत आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत बससेवा सुरू राहील. अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून ज्येष्ठ नागरिक व १० वर्षांखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही.

फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ 50% प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल. सर्वांनी मास्क लावणे आवश्यक आहे. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक असतील. प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे. महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन परब यांनी केले आहे.

Web Title: ST buses will run in the state from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.